आमदार डॉ अनिल बोंडे यांच्या हस्ते आदिवासी भवनाचे भूमिपूजन- ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत नागझिरी व धामणधस गावाचा विकास

0
787
Google search engine
Google search engine

 

वरुड : ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार कार्यक्रम अंतर्गत वरुड तालुक्यातील पळसोना गट ग्राम पंचायत अंतर्गत येणा-या नागझिरी व धामणधस गावाच्या विकासाकरिता मोर्शी विधानसभा मतदार संघाचे भाजपा आ.डॉ.अनिल बोंडे यांनी सततचा पाठपुरावा करून शासनाकडून १२ लक्ष रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला. या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या शुभहस्ते ९ फेब्रुवारी २०१८ रोजी संपन्न होत आहे.

अमरावती जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या वरुड तालूक्यातील ग्राम नागझिरा येथील वार्ड क्र. २ मधील आदिवासी भवनाचे बांधकाम करणेकरिता ५.९९ लक्ष रुपये, धामणधस येथील आदिवासी भवनाचे बांधकाम करणेकरिता ६.०३ लक्ष रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता व निधी प्राप्त करून घेण्यास आमदार डॉ. अनिल बोंडे यांना यश संपादन झाले. याच विकास कामांचे भूमिपूजन मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ अनिल बोंडे यांच्या शुभहस्ते दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ रोजी पळसोना येथे दुपारी ५ वाजता तर नागझिरी येथे सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सूतगिरणीच्या डॉ सौ वसुधाताई बोंडे, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अमरावती ग्रामीणच्या अध्यक्षा व पंचायत समिती सदस्या सौ अंजली तुमराम, प्रमुख अतिथी वरुड शहराच्या नगराध्यक्षा सौ स्वाती आंडे, शेंदूरजनाघाट नगर परिषदेचे अध्यक्ष रुपेश मांडवे, माजी जिल्हा परिषद सभापती सौ अर्चना मुरुमकर, बाळू मुरुमकर, पंचायत समिती सदस्या सौ ललिता लांडगे, सौ चैताली ठाकरे, पळसोना गट ग्रामपंचायत माजी सरपंच तुळशीराम वांदे यांच्यासह आदिमान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी वरुड ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.