तूर चोरी करणारे पोलिसांच्या जाळ्यात

0
695
Google search engine
Google search engine

तूर चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

आसेगाव पोलिसांची धडक कार्यवाही

सायबर सेल च्या मदतीने आरोपी याना अटक

 

शिरजगाव बंड  / वैभव उमक

चांदुर बाजार तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसांपासून तूर चोरीच्या दोन घटना घडल्या त्यामुळे आसेगाव परिसरातील तूर उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते.

दिनांक 8 फ्रेब्रुवारी ला सायंकाळी 9 ते 10 च्या दरम्यान गुप्त माहिती गोळा करून आसेगाव चे ठाणेदार अजय आकरे आनि पोलीस टीम तूर चोरी करणारे आरोपी याचे मोबाईल टॉवर लोकेशन ट्रेस करून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपी हे शेतकरी यांच्या शेतातील तूर हे स्वतः मालक असल्यासारखे शेतातून स्टेशर द्वारे काडत होते आणि हायवे वरून थेट नागपूर ला धान्य गोडावून येथे नेऊन विक्री करीत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली होती.या प्रकरणात आसेगाव पोलिसांनी दीपक लक्ष्मण शेंद्रे वय 27 वर्ष अबासपुर अचलपूर,सादिक खा साबीर खा वय 24 वर्ष मोगताई पुरा परतवाडा,आकाश शिवनाथ पाठक वय 22 वर्ष रायपुरा ता अचलपूर, हरीश रामदास कायतोंडे वय 20 वर्ष रा.रायपुरा अचलपूर, सागर मधुकर बेंडे वय 24 वर्ष रा.सवाईपुर अचलपूर याना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून शेतातील गोडाऊन मधून 8 किटल तूर किंमत 26000 रुपये एक आणि दुसरी गोडाऊन मधून 42 किटल तूर किंमत 84,000 रुपये वाहतुकीचे वाहन,दोन मोटारसायकल अशा एकूण पाच आरोपी सह एकूण 250000 चा माल जप्त केला.ही कार्यवाही आसेगाव चे ठाणेदार अजय आकरे यांच्या मागरदर्शना खाली अजमल सैयद,बाकल,पोलीस हवालदार गिरडकर,पोलीस शिपाई निखिल तलमळे यांनी अमरावती च्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघड केला.