पालकांनीच अनुभवली मुलांची वाचन क्षमता – अधिकाऱ्यांच्या भेटी, बालवाचन सभा

0
1343
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे  / शहेजाद खान –

इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना मूलभुत वाचन यावे यासाठी जिल्हाभर कार्यक्रम सूरु असतांना याच कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील प्रत्येक जि.प. शाळेवर बालवाचन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्वतः पालकांनीच आपापल्या पाल्याची वाचन क्षमता अनुभवली.
31 मार्च पर्यंत जिल्हा परिषद शाळेच्या प्रत्येक मुलाला चांगले वाचन करता यावे यासाठी नुकतीच बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी वाचन विकास कार्यक्रमात स्वतः लक्ष घालून विविध कार्यक्रमाची आखणी केली होती. त्याचाच एक भाग म्हणजे आज शळास्तरावर बालवाचन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यार्थ्यांचे पालक, व शिक्षक उपस्थित ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या गेल्या होत्या. प्रारंभिक, अक्षर स्तर, शब्द स्तर, वाक्यस्तर, परिच्छेद स्तर असे वर्गीकरण करून तालुक्यातील एका एका विद्यार्थ्यांचे वाचन त्यांच्या पालकांपुढे घेण्यात आले. तालुक्यातील जि.प. शाळा, कारला येथे डायटच्या जेष्ठ अधिव्याख्यात हर्षलता बुराडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे वाचन तपासले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितेचे अध्यक्ष दिलीप मेश्राम, उपाध्यक्षा सौ. शेंद्रे व शाळेच्या मुख्याध्यपिका व शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रत्यक्ष वाचन करतांना शाळेतील अनेक मुलांना वाचताच येत नसल्याचे दिसून आले. यावरून श्रीमती बुराडे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांची मीटिंग घेऊन त्यांना याचा जाब विचारला, तर गावातील पालकांशी हि संवाद साधला. मार्च अखेर पर्यंत शाळेतील प्रत्येक मुलाला वाचता यावे यासाठी कार्यक्रम राबवावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांसाठी काम करा।

आपली नियुक्ती हि विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी झाली आहे, प्रयत्न करूनही काही मूल शिकत नाही तर तुमच्या प्रयत्नात बदल करा. खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी वाचन विकास कार्यक्रमात लक्ष घालून काम करीत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतातच तेव्हा अधिकारी बदलले म्हणून कार्यक्रम बदलू देऊ नका. अधिकाऱ्यांसाठी नाही तर विद्यार्थ्यांसाठी काम करत राहा, असे मत गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी झालेल्या मुख्याध्यापक सभेत व्यक्त केले.