राजकमल चौक जवळील नेहरु मैदान शाळेला भीषण आग-महत्वाचे दस्तावेजही आगीच्या भक्षस्थानी

0
1204
Google search engine
Google search engine

अमरावती :

 

स्थानिक नेहरू मैदानावर असलेल्या अमरावती महापालिकेच्या खूप जुन्या लाल शाळेला आज सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आग लागली. अगदी क्षणातच आगीने भीषण रुप धारण करुन संपूर्ण शाळेच्या इमारतीलाच आपल्या कक्षेत घेतले. महानगरपालिकेचा अग्रीशमन दलाने युद्धस्तरावर आग विझविण्याचा प्रयत्न केला .

 

पण आगींच्या ज्वाळा वाढतच जात असल्याने आग विझविण्यात अनेक अडचणी येत होत्या शाळेच्या इमारतीच्या बांधकामात जून्या लाकडाचा वापर असल्याने आगीने क्षणार्धात भीषण रुप धारण केल्याचे बोलले जात आहे. या आगीत लक्षावधी रुपयांच्या संपत्तीसह महापालिकेच्या अनेक दस्तावेजांची जळून राखरांगोळी झाली. मनपा आयुक्त श्री  हेमंत पवार यांच्यासह सर्व अधिकारी तसेच मनपातील पदाधिकारी व काही नगरसेवक घटनास्थळी हजर होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.