पहा काय म्हणाले बाबरचे वंशज याकूब हबीबुब्दीन तुसी श्रीराम मंदिर निर्माण बद्दल

0
720
Google search engine
Google search engine

अयोध्येत भव्य राममंदिरच व्हावे ! – बाबरचे वंशज याकूब हबीबुब्दीन तुसी

मोगल काळातील चुकांसाठी तुसी यांनी क्षमाही मागितली

बाबरी मशिदीसाठी हट्टाला पेटलेल्या मुसलमान संघटनांना सणसणीत चपराक !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येत भव्य राममंदिरच व्हावे, अशी मागणी बाबरचे वंशज याकूब हबीबुब्दीन तुसी यांनी केली, तसेच त्यांनी मोगल काळातील राजांनी केलेल्या चुकांसाठी क्षमा मागितली. ‘सुन्नी सेंट्रल फोरम’ आणि ‘विश्‍व हिंदु परिषद’ हे एकत्र मिळून अयोध्येतील जागेवर भव्य राममंदिर बांधतील,’ असा विश्‍वास तुसी यांनी व्यक्त केला.