चालकावर निष्काळजीपणाने वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल – तुळजापुरजवळील बस अपघात प्रकरण

0
629
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
 चांदुर रेल्वे वरून धामणगाव रेल्वे येथे जाणारी एस.टी. बस अनियंत्रित झाल्याने चांदुर रेल्वे वरून ५ किलोमीटर दूर अंतरावर पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. या घटनेत रात्री उशीरा चालकाविरूध्द निष्काळजीपणाने वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     सविस्तर माहितीनुसार, चांदूर रेल्वे आगाराची अमरावती-चांदूर रेल्वे-धामणगाव एसटी बस (एसएच२७/वाय/५१०४)  सायंकाळी ५.३० वाजता विरूळ रोंघे मार्गे धामणगाव रेल्वेकडे निघाली होती. तुळजापूर गावाजवळच्या वळणावर सदर बस चालकाकडुन अनियंत्रीत झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या एसटी बसचा स्टेंगरींग रॉड तुटल्याने स्टेअरींग जाम होऊन बस पलटल्याचे सांगण्यात आले होते. पोलीसांनी घटनेची चौकशी केल्यानंतर चालक अरविंद रमेश गजभिये यांच्यावर २७९, ३३७ भादवी अन्वये व मोटार वाहन अधिनियम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात सुदैवाने बस समोरील निंभाच्या झाडाला धडकली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. बसमध्ये ७० प्रवासी प्रवास करीत होते व त्यापैकी अबरार अहेमद शेख निसार (३५, धामणगाव), युवराज हरिभाऊ जुनघरे (२५, शिरजगाव), गोदाबाई अंबादास मानवटकर (७०, शिरजगाव), प्रज्वल गजानन घोंगडे (५५, विरूळ रोंघे), चालक यांसह एकुण ७ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे.