रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे ‘हिंदुत्व’ अध्ययन प्रमाणपत्र अभ्यासक्रम

0
1005
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –  राष्ट्रावादाच्या संदर्भात हिंदुत्वाचा राज्यशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करू इच्छिणाऱ्या युवा कार्यकर्त्यांसाठी ‘हिंदुत्व’ अध्ययन प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०९, १० व ११ मार्च, २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या कडून देण्यात आली आहे.

या अभ्याक्रमाचे हे अकरावे वर्ष असून एकूण ४० प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमात राष्ट्रवादाचा उदय व वाटचाल, राष्ट्रावादाचे भाष्यकार (विचारवंत आणि राजकीय नेते), राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीय चळवळ (मार्क्सवाद, इस्लाम, चर्च), भारतीय राष्ट्रवादाचा विकास, हिंदी राष्ट्रवाद, भारतीय कम्युनिस्ट, इस्लाम व ख्रिस्ती समाज (स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भूमिका), लोकजीवनातील हिंदुत्व या विषयांवर प्रा.म.मो.पेंडसे, भाऊ तोरसेकर, अरविंद कुलकर्णी, डॉ. श्रीरंग गोडबोले, डॉ. मनीषा टिकेकर आदी अनुभवी व अभ्यासू वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या केशवसृष्टी, भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आपली नावे नोंदविण्यासाठी अनिल पांचाळ – ९९७५४१५९२२ आणि दीपक ठाकरे – ९८३३४११००५, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, १७, चंचल स्मृती, गं. द. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रियल इस्टेट समोर, वडाळा, मुंबई ३१. दूरध्वनी क्र. ०२२ – २४१३६९६६, २४१८५५०२, samparka@rmponweb.org, website: www.rmponweb.org येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.