रानडुकराच्या हल्ल्यात पळसखेड येथील दोन मुले जखमी

0
813
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान ) 
 तालुक्यातील पळसखेड येथील शेत शिवारात बुधवारी सकाळी ९ वाजता दोन लहान मुलांवर रानडुकराने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे.
      बुधवारी सकाळी पळसखेड येथील संतोष रवींद्र जेवडे वय(१५) व सुरज बालू बुरडे  वय(१४) हे दोघे शेतात गोवऱ्या वेचत होते. अचानक त्यांच्यावर रानडुकराने हल्ला चढविला व त्यात  संतोष जेवडे हा गंभीर जखमी झाला असुन सुरज बुरडे हा किरकोळ जखमी झाला आहे. दोघांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र पळसखेड येथे उपचारासाठी आणले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून ग्रामीण रुग्णालय चांदुर रेल्वे येथे पुढील उपचारासाठी पाठविले. त्यांच्यावर सद्यास खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शेतात जाणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.