चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तालुक्यातील टेंभुर्णी येथे उत्साहात साजरी आली.
टेंभुर्णी गावातुन तुळजाई फ्रेंड्स क्लब व गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. डीजेच्या तालावर ‘शिवाजी महाराज की जय, जय शिवराया’ च्या जयघोषाने टेंभुर्णी गाव दुमदुमले होते. यावेळी तरूणाईचा एकच जल्लोष होता. समस्त गावकरी मंडळी यानिमित्य हजर राहुन शिवरायांना मानवंदना देण्यासाठी एकत्र आली होती. मिरवणुकीच्या आयोजनाकरीता तुळजाई फ्रेंड्स क्लबचे अंकुश खाडे, अनुप शेळके, आशिष राजुरकर, रवि शेळके, प्रफुल शेळके, अक्षय टोपले, सुरज खाडे, मनमोहन घोडमारे, मुकुंद वडस्कर, अमोल शेळके, जिवन शेळके, विजय खाडे, अरूणराव शेळके, संगिता घोडमारे, वर्षा हरणे, सुधिर हरणे, सुदर्शन हरणे, पृथ्वीराज सोमकुवर, किशोर हरणे व गावकऱ्यांनी अथक परीश्रम घेतले.