आपण होऊ दुष्काळ मुक्त……

0
886
Google search engine
Google search engine

शेगांव:- आज शेगांव येथे सुजलाम-सुफलाम बुलढाणा या मिशन अंतर्गत भारतीय जैन संघटना आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यामानाने सामाजिक उपक्रमाचा पारंभ झाला मराठवाडा धर्तीवर जे शासनाने नदी,नाले व तलाव याचे खोली कारण केले त्याचा फायदा आज आपण पाहत आहात त्यामळे तेथील अनेक जिल्हे तालुके जलयुक्त झाले.
बुलढाणा जिल्हा हा जलयुक्त करण्यासाठी तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोठया प्रमाणात जिल्ह्यात जे.सी.बी(JCB) व पोकलेन देण्यात आले त्यात शेगांव करिता ०९ जेसीबी व १ पोकलेन देण्यात आले ज्यामुळे जिल्ह्यातील व तालुक्यतील या वर्षी मार्च ते जून या कालावधीत नदी,नाले,पाझर तलाव, गाव तलावातील गाळ,धरण,बंदरे याचा गाळ काडून पाण्याची साठवण क्षमता पूर्वस्थापित करण्याचा प्रयत्न आहे.या सर्व कामाचे नियोजन व सनियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात समिती गठीत करण्यात आली आहे. यामधून निघालेल्या गाळाचा उपयोग शेतकरीची जमीन भुसभुशीत व सुपीकता वाढविण्यास मदत होईल सोबत शेकऱ्यांना शेतीत उत्पन्न होईल पाण्याचा होत असलेला दुष्काळ दूर होईल. जेसीबी साठी लागणारे इंधन पुरवठा हा शासना तर्फे करण्यात येणार आहे. त्यानंतर तहसीलदार यांच्या हस्ते जसीबीचे पूजन करण्यात आले त्यावेळी बीडिओ श्रीकृष्ण सावळे,सापांचपती केशव हिंगणे,युकॉ शहराध्यक्ष पवन पचेरवाल, तसेच भारतीय जैन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश जैन,उपाध्यक्ष रुपेश चवरे,सचिव रोहित जैन,डॉ.कोटेजा,कुमार चवरे,प्रकासचंद कासलिवाल,रिखबचंद बाफना जिल्हाकोअर कमिटी,संजय महाजन,आदी सभासद तसेच तहसील कर्मचारी वृंद उपस्तीत होते. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान तहसीलदार गणेश पवार साहेब यांनी केले.