दापोरी नगरीमध्ये लालदासबाबा पुण्यतिथि महोत्सवास् सुरुवात – सन १९२० पासून लालदासबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सव

0
678
Google search engine
Google search engine

लालदासबाबांचा ९८ वा पुण्यतिथी महोत्सव !

संत लालदासबाबा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान !

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /_

मोर्शी तालुक्यातील दापोरी या नगरीला श्री संत लालदासबाबा यांनी आपली कर्मभूमी निवडून विशेष कार्य केले . त्यामुळे दापोरी या गावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे . श्री संत गजानन महाराज यांच्या समकालीन कालखंडात दापोरी येथे प्रगट झालेले श्री संत लालदास बाबा यांचा ९८ वा भव्य पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात दापोरी नगरीत संपन्न होत आहे . लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले लालदासबाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा कारण्याकरिता दापोरी नागरीमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथून व परिसरातील पंचक्रोशीतील लाखो भाविक सहभागी होत एकादशीला लालदासबाबा यांच्या समाधीचा अभिषेक करून तिर्थस्थापणेने या सप्ताहाची सुरुवात होते . फाल्गुन कृष्ण द्वादशी पासून सुरु होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवात काकडा , आरती , भागवत प्रवचन , हरिपाठ , अखंड विना वादन , कीर्तन , आरती , भजन , यासह विविध कार्यक्रम व नवनवीन स्पर्धांचे उपक्रम राबविले जातात . दापोरी नगरीमध्ये लालदासबाबा बद्दल श्रद्धेची भावना असून या पावन भूमीत पुण्यतिथी महोत्सवाला येणाऱ्या भक्तांची प्रचंड वर्दळ असते .

दापोरी येथे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लालदास बाबा यांचा ९८ वा भव्य पुण्यतिथि महोत्सव दापोरी नगरीमध्ये सालाबादा प्रमाने यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असून या महोत्सवा निमित्य संगीतमय सदृश्यमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह मोठ्या उत्साहात सुरु होणार असून ह भ प श्री स्वामी सारंग चैतन्य महाराज भागवताचार्य लहरीबाबा संसथान श्री क्षेत्र मधापुरी यांच्या मधुर वानीतून सुरु होणार आहे .

या पुण्यतिथी माहोत्सवा निमित्य दापोरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दापोरी नगरी मधे आनंदाचे व उत्साहचे वातावरण असून रोज हरिपाठ ,काकड़ा आरती , सत्संग , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रार्थना , खंजेरी भजन , अवधुति भजन , यासारखे विवध धार्मिक कार्यक्रम बाराही महिने सुरु राहत असून या भगवत सप्ताहाला रोज हजारो भक्तांचा प्रतिसाद मिळत असून दापोरी नगरीमधे २१ तारखेला लालदास बाबा यांच्या पालखिचि भव्य शोभा यात्रा निघणार असून लालदास बाबा यांच्या जीवन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार असून या पुण्यतिथि महोत्सवाला लाखो भक्तांचा जनसागर उसळणार आहे . लालदास बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवात मोठ्या संखेणे उपस्थित राहन्याचे आवाहन लालदास बाबा संस्थान चे अध्यक्ष , उपाध्यक्ष , कार्यकारिणी मंडळ, व दापोरी येथील समस्त गावकारी मंडळी यांनी केले आहे . दापोरी येथील लालदासबाबा देवस्थान र नं ए १८४३ ता मोर्शी जी अमरावती यांच्या समाधी स्थळाला शासनाचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मंजूर झाला असून या तीर्थक्षेत्र स्थळाच्या वृक्षाचे रूपांतर वटवृक्षात झाले असून माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख व माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालिताई प्रकाशराव विघे यांच्या निधीतून लालदासबाबा यांच्या समाधी स्थळाचे सौंदर्रीकरण करणे व ३ सभागृह बांधकाम, नदीवरील पुलाचे बांधकाम , करण्याकरिता लाखो रुपये निधी उपलब्ध करून तसेच गावकऱ्यांच्या सहभागातून दापोरी येथील तिर्थस्थळाचा विकास झाला हे विशेष .