चांदूर रेल्वे शहरात झुलेलाल जयंती उत्साहात साजरी

0
560
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
आयोलाल झुलेलालच्या जयघोषात सोमवारी सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची १०६८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रभात फेरीसह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शहरातुन सिंधी कॉलनीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
  सोमवारी सकाळी ६ वाजता झुलेलाल भगवान यांची पंचामृत स्नान सोहळा पार पडला. त्यानंतर प्रभातफेरी, सामूहिक आरती करण्यात आली. सिंधी कॅम्पमध्ये सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी सिंधी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.