स्वतःची शाळा म्हणून शाळेकडे पहा – गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे >< शाळा व्यवस्थापन समितीची कार्यशाळा

0
787
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान .) 

जिल्हा परिषद शाळेचे खरे मालक हे शाळा व्यवस्थापन समितीचं असते, शाळेचे यश अपयशात त्यांचा हि वाटा असतो त्यामुळे अधिकारासोबत शाळा व्यवस्थापन समितीने समितीचे कर्तव्य व जबाबदाऱ्या समजावून घेणे गरजेचे आहे, तुम्ही स्वतःची शाल म्हणून शाळेकडे पहावे असे मत गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी शाळा व्यवस्थापन समिती कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार तालुक्यात कृष्णाजी सागर पर्यटन स्थळावर शाळा व्यवस्थापन समिती कार्यशाळेचे आयोजन गट साधन केंद्र च्या वतीने करण्यात आले होते, यावेळी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद क्षेत्रातील 350 शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते, यावेळी 100 टक्के मुले शिकण्यासाठी व शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी व कर्तव्याची जाणीव, यशस्वी व परिणामकारक काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती सोबत विचारविनिमय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत विषय साधन व्यक्ती विवेक राऊत, यांनी केले, तर प्रगत शाळा, डिजिटल स्कूल वर श्रीनाथ वानखडे यांनी तर पटसंख्या वाढलेल्या शाळा लोकसहभाग मिळविणाऱ्या शाळा याविषयी साधन व्यक्ती मंगेश ऊल्हे यांनी मार्गदर्शन केले स्थलांतर थांबविलेल्या शाळा, शाळा बाह्य विरहित शाळा, या सर्व विषयावर शाळेच्या मुख्यध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांचे मनोगत या वेळी घेण्यात आले तर शैक्षणिक आराखडा निर्मिती ची सविस्तर माहिती केंद्र प्रमुख श्री  मनोहर फ़ाले यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन नारायण अतकरे यांनी केले या वेळी विषय साधन व्यक्ती सतिष मनोहर, सभा शेख, वर्षा गादे यांनी व्यवस्थापन पाहिले, सुरेश ठाकरे, अरविंद बनसोड, व काही पालकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

शिक्षकांची प्रशिक्षणे सुरवातीला घ्यावे

आता विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या सुरु आहे, लगेच पुढील महिन्यात त्यांच्या वार्षिक परीक्षा सुरु होतील, आणि आता खऱ्या अर्थाने त्यांना मार्गदर्शनाची गरज असतांना विविध प्रशिक्षणात शिक्षक अटकली आहेत त्यामुळे शाळा ओस पडल्या, त्यामुळे पुढील वर्षी पासून शिक्षकांचे प्रशिक्षण हे शाळेच्या सुरवातीलाच घेण्यात यावे व तसा ठरावच आम्ही घेणार असल्याचा सूर यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितुन पुढे आले