दोषी वर कार्यवाही करा.मुन्ना बोडे

0
908
Google search engine
Google search engine
वाघमारे ते तायडे दलित वस्ती च्या रोडच्या बांधकाम प्रकरणी चौकशी कधी?
1 महिना चा कालावधी संपला तरी थर्ड पार्टीचौकशी  नाही.?re
चांदुर बाजार :-
चांदुर बाजार वरून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या वार्ड क्रमांक 4 मधील प्रल्हादपुर परिसर मध्ये दलित वस्ती रोडच्या बांधकाम मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य अभिजित बोडे यांनी केली होती.तसेच त्या रोडच्या बाधकामचे चौकशी करून त्याची थर्ड पार्टी कडून पाहणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती.पंचायत समिती येथे झालेल्या आम सभेमध्ये सुद्धा या भ्रष्टाचार चा विषय चांगला गाजला होता.
आम सभे मध्ये या रोडच्या संदर्भात थर्ड पार्टी ही सात दिवसाच्या आता करण्या संबंधी निर्णय सुद्धा घेण्यात आला होता मात्र अजून पर्यंत कोणत्याच प्रकारची चौकशी त्या रोड संदर्भात झाली नाही.त्या रोड वर बांधकाम चे फलक सुद्धा अजून पर्यंत लागले नाही.आणि त्या ठेकेदार यांचे 80%बिल सुद्धा निघाले.तांत्रिक दृष्ट्या जवळपास 4 महिन्याच्या कालावधी मध्ये रोडला मधातून भेगा पडत आहे.आणि अजून पर्यंत चौकशी नाही.त्यामुळे मुद्धाम चौकशी लांबणीवर टाकली जात आहे का अशी चर्चा सुरू आहे.
प्रतिक्रिया
1)पंचायत समिती कडून थर्ड पार्टी करण्या संदर्भात कोणतेच पत्र प्राप्त झाले नाही त्यामुळे आम्ही थर्ड पार्टी कशी करणार.
निलेश चौधरी  अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग चांदुर बाजार.
2)जवळ पास 1 महिन्याचा कालावधीत होत आल्याने या रोडच्या कोणत्याच प्रकारची चौकशी नाही झाली. अजून पर्यंत। थर्ड पार्टी झाली नाही.लवकरात लवकर चौकशी करून दोषी अधिकारी यांच्या वर कार्यवाही व्हावी.
अभिजित बोंडे तक्रार कर्ते पंचायत समिती सदस्य