पेसोडा ग्रामस्थांचे पं.स.कार्यालयासमोर – शौचालय बांधकाम घोळयातील चौकशी करीता आमरण उपोषण

0
1042
Google search engine
Google search engine

संग्रामपुर / दयालसिंग चव्हाण/-

:- तालुक्यातील पेसोडा ग्रामस्थांचे पं.स.कार्यालयासमोर आज दिनांक 26 मार्च रोजी शौचालय बांधकाम घोळयातील चौकशी करण्याकरीता आमरण उपोषण सुरु केले आहे.

पेसोडा येथील भागवत शेषराव भिसे , मुरलीधर हरिदास सैरिसे, अरविंद विठठल भिसे यांनी दिनांक 21 मार्च रोजी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरुपाचे‍ निवेदन देण्यात आले असून पेसोडा हे गांव 100 टक्के हागणदारी मुक्त़ झाले असल्याचे वरीष्ठाकडे लेखी स्वरुपात अहवाल पाठविले असता जिल्हा परीषदाकडुन सन्मानित झाले आहे. परंतु या गावातील ग्रामसेवाकांनी काही ग्रामस्थाकडुन पैसे घेऊन स्वच्छलय न बांधता त्यांना अनुदान वाटप केले. एकाच जागेचा नमुना 8 असतांना त्याच जागेवर चारचार स्वच्छालय अनुदान देल्याचे ग्रामसेवकानी शासनाची फसवणूक केली . व इतर ग्रामस्थांना स्वच्छालयाची बांधकाम न करता कागदोपत्री स्वच्छालय दाखवुन लाखो रुपयाचा अनुदान वाटप केले. तसेच या ग्रामपंचायतील स्वच्छालय लाभार्थी यांनी ग्रामसेवकांना यादीची मागणी केली असता त्यांनी पंचायत समितीमधुन बनावाट यादी देऊन उपोषणकर्तायांची दिशाभुल केली आहे. स्थानिक ग्रा.पं.पातळीवर ग्रामस्थांकाकडुन पैसे घेऊन त्यांनाच स्वच्छालयाचा लाभ दिला जात असल्याने आणि ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांना मात्र स्वच्छलयाचे बांधकाम पुर्ण करुन त्या लाभार्थ्यालाअनुदान दिले जात नसल्यामुळे ग्रामसेवकांचे या मनमानीमुळे गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या स्वच्छालय घोटाळयाची चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी उपोषणकर्ते भागवत शेषराव भिसे, मुरलीधर हरिदास सैरीसे ,रविंद्र भिसे यांनी केली आहे. या उपोषण मंडपात संबंधीत अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये ओरड दिसुन येत आहे. हयावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्व़र गोल्ह़र , पत्रकार संघटनेचे अध्यक्ष केशवरावजी घाटे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण भटकर आदिसह पेसोडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.