खेड येथील पुतळ्याच्या विटंबनेचे कारण देत प्रशासनाकडून चिपळूण येथील हिंदु धर्मजागृती सभेची अनुमती रहित !

0
1124
Google search engine
Google search engine

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना आणि हिंदु धर्मजागृती सभा यांचा दुरान्वयेही संबंध नसतांना पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करून ती रहित करण्यास भाग पाडणे, हे अनाकलनीय आहे. यामुळे हिंदूंची झालेली असुविधा यास उत्तरदायी कोण ? इतर वेळी जनताभिमुख कारभाराच्या गप्पा मारणारे सरकार हिंदूंच्या संदर्भात मात्र हे सूत्र विसरते, हेच खरे !

 

चिपळूण- – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना झाली. त्यामुळे खेड आणि आसपासच्या परिसरामध्ये संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेली आजची (२६ मार्चला असलेली) हिंदु धर्मजागृती सभा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेता रहित करावी’, अशा प्रकारचे लेखी पत्र प्रांताधिकार्‍यांकडून देण्यात आले. पोलिसांकडूनही ‘ही सभा रहित करून सहकार्य करावे’, असे सांगून त्यांनी दिलेली अनुमती रहित केली. त्यानंतर समितीने २६ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता जोशी मैदान, भोगाळे, तालुका चिपळूण येथे होणारी हिंदु धर्मजागृती सभा रहित केली.

‘पुढचा दिनांक निश्‍चित होताच तालुक्यातील आणि जिल्ह्यातील धर्मप्रेमींपर्यंत ही माहिती पोहोचवण्यात येईल’, असे हिंदु जनजागृती समितीने कळवले आहे.

 

संदर्भ :- सनातन प्रभात (वृत्त संकेतस्थळ)