कार्यकर्त्यांच्या पाठबळातूनच जनसेवेची प्रेरणा मिळाली :प्रा.टी.पी.मुंडे

0
864
Google search engine
Google search engine
  • कार्यकर्त्यांच्या पाठबळातूनच जनसेवेची प्रेरणा मिळाली.
  • नागरी सत्कार प्रसंगी प्रा.टी.पी.मुंडे यांचे भावनिक उद्‌गार.

    बीड: नितीन ढाकणे
    परळी वै.दि.28
    40 वर्षाच्या राजकिय आयुष्यात हजारो कार्यकर्ते जवळ आले, सुख-दु:खात, संकटात ते सावलीप्रमाणे सोबत राहिले. त्यांच्याकडून मिळालेल्या पाठबळातूनच जनसेवेची प्रेरणा मिळाली. लोककल्याणासाठी संघर्ष करण्याचा बाणा निर्माण झाला. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात काम करण्याची मिळालेली संधी हा आपला नव्हे तर कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. असे भावनीक उद्‌गार महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा अखिल भारतीय कॉंग्रेस कार्यकारणी सदस्य प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी काढले.

    प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांची अखिल भारतीय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर सदस्य म्हणून निवड झाल्या बद्दल त्यांचा लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी रिपाई चे राज्य सचिव भास्कर नाना रोडे हे होते. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. 40 वर्षाच्या राजकिय प्रवासात अनेक चढउतार आले, संकटे आली परंतू कार्यकर्त्यांनी मात्र आपली साथ कधीच सोडली नाही, सावली प्रमाणे ते सोबत राहिले. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची मिळालेली संधी हा कार्यकर्त्यांचाच बहुमान आहे.

    कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराची पुरोगामी चळवळ सुरू ठेवण्याचे कार्य आपण केले आहे. या माध्यमातून शेतकरी, शेतमजुर, दलीत, अल्पसंख्याक, महिला, कर्मचारी, व्यापारी यांच्या हितासाठी कडवा संघर्ष केला. भाजप व संघा सारख्या जातीयवादी पक्षाकडून होणारे समाजाचे शोषण रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. या सर्व कार्याची दखल घेवूनच कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रीय कार्यकारणीवर काम करण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली.या निमित्ताने आपण देशाच्या राजकारणात पदार्पण केले असले तरी येथील कार्यकर्त्यांना व कर्मभुमीला कधीही विसरणार नाही असेही ते म्हणाले.

    अध्यक्ष समारोपात भास्कर रोडे यांनी प्रा.टी.पी.मुंडे (सर)यांच्या समाजकारण करण्याच्या कुशल वृत्तीचे कौतूक करून त्यांच्याकडूनच आपल्यालाही समाजकारणाचे धडे मिळाल्याचे सांगितले. जेष्ठ विचारवंत माजी प्राचार्य के.आर.बंग यांनी विद्यार्थीदशे पासूनच संघर्षात

    उतरलेल्या प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांच्या कार्यावर प्रकाश टाकून कॉंग्रेस पक्ष संघर्षशील नेतृत्वाची जपवणूक करणारा राजकीय पक्ष असल्याचे सांगितले. सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक एकतावादी रिपाईचे पंडीत झिंजुर्डे यांनी केले.

    या कार्यक्रमाला जेष्ठ नेते किर्तीकुमार नरवणे, जनार्धन गाडे गुरूजी,प्रा. नरहरी काकडे, ईसाकभाई कटाळू, माणिकराव नागरगोजे, प्रा.जी.एम.आवस्थी, नारायणदेव गोपनपाळे, मुळे मामा, सुधीर फुलारी, अनिल मस्के, ओमप्रकाश सारडा,  ऍड अनिल मुंडे, सलाउद्दीन मामु, तालुका अध्यक्ष सुर्यकांत मुंडे, शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, विठ्ठलराव गुट्टे भालचंद्र तांदळे, शेख अहेमद अंकल, आत्माराम कराड, भिसाराम राठोड, प्रभुअप्पा तोंडारे, रामकिशन घाडगे बहादूरसेठ, प्रभाकर फड,भागवत सलगर, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष तथा मार्केट कमेटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे, नितीन शिंदे, छत्रपती कावळे, रावसाहेब देशमुख, अंगदराव काकडे, बालासाहेब पाथरकर, डॉ.शेख, डॉ.माणिकराव कांबळे, व्यंकटी गित्ते, शशिशेखर चौधरी, नवनाथ क्षिरसागर, विश्वनाथ इंगळे, भगवान साकसमुद्रे, . संजय जगतकर, जि.प.सदस्य प्रदिपभैय्या मुंडे, प्राचार्य बी.डी.मुंडे, रघुनाथ डोळस, शेख सिकंदर, शिवा महाजन, सुनिल कांबळे, राहूल कांदे, विश्वनाथ गायकवाड, किशोर जाधव, मनोज संकाये, शिवा चिकले, गणेश सावंत, सरपंच भागवत मुंडे, जम्मुसेठ, बबलू सय्यद, बदरभाई, नुरबानोखाला, विश्वनाथ देवकर आदि सह हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सहदेव घरजाळे, बालासाहेब गायकवाड, तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष सुर्यकांत मुंडे यांनी केले

  • .
  •  

  • क्षण चित्रे

    * प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला हजारो कार्यकर्त्यांचा उदंड उत्साह  दिसून येत होता.

    * नागरी सत्कार सोहळ्यात अनेक सेवाभावी संस्था सामाजिक संघटना,महिला संघटनांचा  सहभाग उल्लेखनिय होता

    * रिपाईचे राज्यसचिव भास्करनाना रोडे यांनी प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांचा त्यांच्या सुविध्य  पत्नी सरपंच सौ.शिवशैलाताई मुंडे यांचा सपत्नीक सत्कार केला. 

    * लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर परिसराला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले  होते.सभागृहात तेवढेच बाहेर उभा राहिलेले तेवढेच कार्यकर्ते असे चित्र दिसत होते.

    * प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी  कार्यकर्त्यांनी व्यासपिठावर प्रचंड गर्दी केली होती.