कुणबी समाजाचे वरिष्ठ समाज सेवक मा. व्ही. जी. पाटील यांचा ७१ वां वाढदिवस उत्साहात साजरा

0
1107
Google search engine
Google search engine

पालघर: कुणबी बहुजन समाजाचे जेष्ठ नेतृत्व, विक्रमगड तालुक्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, समाज सेवक वसंत गणू पाटील यांचा ७१ वां वाढदिवस अनेक मान्यवरांच्या आणि परिवाराच्यावतीने 1 एप्रिल २०१८ रोजीं, कला वाणिज्य विद्यालय, मु. औदे, पालघर येथे साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील विविध मान्यवर तसेच अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. व्ही. जी पाटील यांनी बहुजन समाजाला दिशा देण्याचे कार्य निस्वार्थी भावनेने केले व आजही करीत आहेत. आदिवासी बहुल भागात उच्च शिक्षणासाठी त्यांनी कॉलेज बांधले व आज या ठिकाणी अनेक आदिवासी, ओबीसी या शेतकरी कष्टकरी समाजातील मुले शिक्षण घेत आहेत. आपल्या ७१ वर्षाच्या जीवनाच्या प्रवासात त्यांनी अनेक धाडसाची कामे केली तसेच त्यांच्या सानिध्यात जे जे लोक आले त्यांनी त्यांना जगण्याची दिशा दिली. त्यांचे कार्य समाजाला प्रगतीकडे घेवून जाणारे आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या व आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आंदोलने केली. प्रत्येक सामाजिक कार्यात तन, मन, आणि धन त्यांनी अर्पण केले. त्यांच्या आदर्श सर्वांनी जोपासायला हवा

विविध भेटवस्तू, पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डॉ. अरुण सावंत, डॉ. नितीन मोकाशी, निवार्थी समाजसेवक निलेश सांबरे, सौ. सुवर्णा पाटील, कुणबी युवाचे माधव कांबळे, सुनील गावडे, सुर्यकांत गोताड, तुकाराम भेकरे, विष्णू खापरे, अनिल अवेरे, सुरेंद्र भावे, थारली साहेब, नरेश म्हसकर, आदित्य कांबळे, विशाल पाटील, वैभव यशवंत, युवराज संतोष, मनोहर पवार असे मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली. कुणबी ओबीसी समाजाचे संविधानिक अधिकार, राजकीय होत असलेली वाताहत याबाबत चर्चा करण्यात आली. समाजाच्या वतीने यापुढील सर्वच निवडणुका लढविल्या जातील, कोकणातील सर्व कुणबी समाजाने बहुजन समाजाला सोबत घेवून आपली ओळख निर्माण करायची आहे यापुढे आपण सर्वांनी हातात हात घालून समाजाला पुढे घेवून जायचे आहे असा संकल्प यानिमित्त करण्यात आला.