झाराप तिठा येथे अपघात तरुण गंभीर

जाहिरात-2

सावंतवाडी | सिद्धेश सावंत :

झाराप तीठा येथे दुचाकी व चारचाकी मध्ये झालेल्या अपघातात आकेरी येथील तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.अनिल जगन्नाथ धोपेश्वरकर,असे या तरुणाचे नाव आहे.त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.ही घटना आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.धडक देऊन चारचाकीने पलायन केले.

अनिल धोपेश्वरकर हे कुडाळहुन माणगावला जात होते याचवेळी झाराप तीठा समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकीने त्यांना समोरून धडक दिली.यात ते गंभीर जखमी झाले.त्यांना अनिकेत तेंडोलकर, शिवसेनेचे अशोक बांबर्डेकर,संदेश साबळे आदींनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.

जाहिरात4