*बारा राशींचे हे १२ गणेश मंत्र*

339
जाहिरात

शास्त्रामध्ये गणपतीची भक्ती चेतना, बुद्धी, सौभाग्य, आणि सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे. गणपतीचे स्मरण केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गणपतीची पूजा करण्याचे महत्व सांगितले गेले आहे.

प्रत्येक पक्षातील चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत.
कृष्ण पक्षातील चतुर्थीस विनायकी. मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात.

आम्ही तुम्हाला विविध सोपे गणेश मंत्र व पूजा उपाय सांगणार आहोत.
*या मंत्राचा जप केल्यास तुम्हाला सुख, सौभाग्य, ऐश्वर्य, यश प्राप्त होईल.*

 

*मेष -*
गणपतीची पूजा करताना ‘ऊँ विघ्नराजाय नम:’ या मंत्राचा उच्चार करीत, रेशमी ओढणी अर्पण करावी. वैवाहिक जीवनात प्रेम व विश्वास वाढेल

*वृषभ -*
‘ऊँ भक्तविघ्नविनाशाय नम:’ या मंत्राचा उच्चार करीत, गणपतीला पाच वेगवेगळ्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा. भौतिक सुख प्राप्त होईल.

*मिथुन -*
‘ऊँ भक्तवांछितदायकाय नम:’ या मंत्राचा उच्चार करीत, गणपतीच्या प्रतिमेवर दुध अर्पण करावे. पैशाची कमतरता व कुटुंबातील कलह दूर होतील.

*कर्क -*
‘ऊँ दूर्वाबिल्वप्रियाय नम:’ या मंत्राचा उच्चार करीत, गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात. मानसिक आणि शारीरिक त्रास दूर होईल.

*सिंह -*
‘ऊँ सर्वसिद्धिप्रदाय नम:’ मंत्राचा उच्चार करीत स्फटिकाच्या गणेश मूर्तीला शेंदूर लावावा. समाजात मान-सन्मान वाढेल.

*कन्या -*
‘ऊँ अकल्माषय नम:’ या मंत्राचा उच्चार करीत, लाल चंदन गणपतीला अर्पण करावे. कार्यक्षेत्रातील व कुटुंबातील समस्या दूर होतील

*तूळ -*
‘ऊँ हरये नम:’ या मंत्राचा उच्चार करीत, आंब्याच्या पानांनी गणपतीची पूजा करावी. जीवनातील दुःख आणि कष्ट दूर होतील.

*वृश्चिक -*
‘ऊँ शान्ताय नम:’ या मंत्राचा उच्चार करीत गुळ, दही आणि साखरच नैवेद्य दाखवावा. तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.

*धनु -*
‘ऊँ प्रसन्नात्मने नम:’ या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला पंचामृताचा अभिषेक करावा. आर्थिक लाभाच्या शक्यता वाढतील

*मकर -*
‘ऊँ गजाननाय नम:’ या मंत्राचा उच्चार करीत, तांब्याचे नाणे काळ्या दोर्यात बांधून गणपतीला अर्पण करा. धनलाभ होईल.

*कुंभ -*
‘ऊँ ज्ञानिने नम:’ या मंत्राचा उच्चार करीत, गणपतीला गुलाबाचे फुल अर्पण करावे. अपत्य सुख प्राप्त होईल.

*मीन -*
‘ऊँ चतुराय नम:’ या मंत्राचा उच्चार करीत, पिवळा रेशमी कपडा गणपतीला अर्पण करावा. नोकरी, व्यापारात लाभ होईल

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।