राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर पत्रकारांचे एक सशक्त संघटन  उभारणार :-श्री  किशोर आबिटकर >< द पॉवर ऑफ मिडिया पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

0
750
Google search engine
Google search engine

कडेगांव / हेमंत व्यास :-

राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर पत्रकारांचे एक सशक्त संघटन द पॉवर ऑफ मीडिया ग्रुप ‘ उभारण्यात आले असून पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत रहाणार आहोत.
असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष किशोरजी आबिटकर यांनी केली

शासकीय विश्रामगृह सांगली येथे पार पाडलेल्या ‘द पॉवर ऑफ मिडियाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ‘संस्थापक अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार किशोरजी आबिटकर (कोल्हापूर ), तर संस्थापक उपाध्यक्षपदी महादेव चव्हाण (सोलापूर ) यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी तानाजीराजे जाधव (सांगली) आणि सचिवपदी अनिल कदम ( सातारा ) यांचीही नियुक्ती करण्यात आली.
त्याच बरोबर ‘पॉवर ऑफ मीडियाच्या कोअर कमिटी सदस्य पदी ईश्वर हुलवान (सांगली), ताजुद्दीन शेख (पुणे), राजू जवंजाळ (औरंगाबाद ), मधुकर गलांडे(पूणे), शामभाऊ जांबोलीकर(ठाणे) कुलभूषण महाजन (सांगली), संदीप बाजड ( अमरावती), कांचन जांबोटी (मुंबई) आदींची निवड करण्यात आली. सर्वच मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी अजिंक्य गोवेकर यांची मंत्रालय प्रतिनिधी, कर्नाटक संपर्क प्रमूख प्रोफेसर अजित सगरे (बेळगाव) व ऋषीकेश वागमारे यांची अमरावती विभाग प्रमुखपदी सर्वनुमते निवड करण्यात आली,
‘द पॉवर ऑफ मीडिया ग्रुप ‘ हा लवकरच राज्यभरातील कानाकोपऱ्यात पोहचणार असून येत्या दोन महिन्यात राज्यस्तरिय आणि राज्यातील प्रत्येक जिह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या जाणार आहेत .
अशी घोषणा अध्यक्ष किशोरजी आबिटकर यांनी केली.