सम्राट अशोक विचार मंचच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती उत्साहात साजरी  

0
981
Google search engine
Google search engine

 

थोर कायदे तज्ञ, स्त्री उद्धारक, भारतीय घटनेसे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती सम्राट अशोक विचार मंच रेल्वे कर्मचारी संघाच्या वतीने रेल्वे स्टेशन येथे साजरी करण्यात आली

बीड: नितीन एस ढाकणे

परळी: थोर कायदे तज्ञ, स्त्री उद्धारक, भारतीय घटनेसे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती सम्राट अशोक विचार मंच व रेल्वे कर्मचारी संघाच्या वतीने रेल्वे स्टेशन येथे साजरी करण्यात आली.

प्रथम एस.एस.सोनावणे व आर.एस.दहिवाडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आयु.सोनबा वाघमारे, रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सर्वांनी सामूहिक त्रिशरण व पंचशील घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.

त्यानंतर रेल्वे स्टेशन मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस रेल्वे कर्मचारी श्री.बालाजी देवडे मांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच, हितकर टी-हाऊस जवळील चौकात निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण श्री महेंद्र वाघमारे यांचे हस्ते करण्यात आले.

बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे व विरोधी पक्षनेते मा.धनंजय मुंडे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच, समता सैनिक दलाच्या वतीने डॉ.बाबासाहेबांना मान वंदना देण्यात आली. या वर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करण्मात आले होते. तेथील नयनरम्य दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मा वेळी रेल्वे स्टेशन ऑटो युनियन च्या वतीने सर्वांना खिचडी चे वाटप करण्यात आले.

मा कार्यक्रमास सम्राट अशोक विचार मंचचे अशोक वाघमारे, एस.एस.सोनवणे, आर.एस.दहीवडे, रिपाईचे धम्मानंद मुंडे, प्रा.दासू वाघमारे, सुभाष वाघमारे, दास बनसोडे, शिवाजी बनसोडे, रमेश मोरे, महेंद्र वाघमारे, उत्तम कांबळे, सहदेव कांबळे, सतीश कांबळे, राम कांबळे, धोंडीराम वाघमारे, मलकार वाघमारे, बालाजी देवडे, भा.री.प.चे एन.के.अप्पा, सरवदे, मिलिंद घाडगे, जे.के.कांबळे, मनोहर कांबळे, चंदर कांबळे, ब.स.पा.चे डॉ.गायकवाड, अ‍ॅॅड.डी.एल. उजगरे, भीमराव गोदाम, सुदाम गायकवाड, निवृत्ती कांबळे, श्री.डोंबे, मुरलीधर आचार्म, दशरथ जोगदंड, डी.के.चिकाटे, रावसाहेब जगताप, श्री.होके सर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.