शिरजगाव कसबा येथील तलाठी यांची बदली

0
843
Google search engine
Google search engine

👉🏻तलाठी काझी यांची बदली,तहसीलदार यांचा अहवाल ठरणार निर्णायक

👉🏻सर्वेक्षण दरम्यान अनेक रहस्य समोर ,8 महिण्याअगोदर त्या तक्रार चे काय?

चांदुर बाजार :-
नुकत्याच चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील तलाठी भाग 2 मध्ये कार्यरत असलेल्या तलाठी काझी याना पैसे न दिल्याने फेब्रुवारी मध्ये झालेल्या गारपीट मधून शेतकरी नाजीमबेग बशीरबेग याना वगळले असल्याने आणि स्वतःच्या नातेवाईक याना भरमसाठ शासकीय अनुदान मिळून दिल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे पीडित शेतकरी यांनी केली होती.यामध्ये दिनांक 24 एप्रिल आणि 25 एप्रिल दोन दिवस तहसीलदार यांनी चौकशी केली.मात्र या चौकशी मध्ये अनेक रहस्य मय सत्य दिसून आल्याची चर्चा शिरजगाव कसबा येथील शेतकरी यांच्या दिसून आले आहे.मात्र अहवाल देण्या अगोदरच तलाठी काझी यांची शिरजगाव कसबा वरून दुसऱ्या या ठिकाणी बदली केल्याचे समजण्यात आले.बुधवार रात्री पर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.मात्र त्यामुळे नेमके पाणी कोठे मुरत आहे या अलिप्तच आहे.

*याच्या अगोदर सुद्धा दिनांक 31 जुलै 2017 मध्ये तलाठी यांची तक्रार झाली होती.मात्र या संबंधी चौकशी अधिकारी म्हणून त्यावेळी अर्जुन वांदे होते.त्यांना या प्रकरणी विचारणा केली असता.त्यांनी हास्यस्पद उत्तर दिले आहे.तर याच प्रकरणी तहसीलदार शिल्पा बोबडे विचारले असता त्यांनी आम्ही त्या तक्रार ची चौकशी करून उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अहवाल पाठविला असल्याचे सांगितले.*
*मात्र त्यावेळी तलाठी यांच्या वर कोणती कार्यवाही झाली हे गुलदस्त्यात अडकून राहिले आहे.त्यामुळे तलाठी काझी याना वाचविण्याचा प्रयत्न त्यावेळी झाला होता का अशा संभ्रम निर्माण झाला आहे.या प्रकरण मुळे आताची तक्रार नाझीम बेग यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या केली नसल्याचे समोर येत आहे.*

तर शिरजगाव कसबा येथील आता झालेल्या तक्रार मुळे अजून चौकशी अहवाल सुद्धा दिला नाही आला .आणि तलाठी काझी यांची बदली ही वाचविण्यासाठी करण्यात आली का ?अशी चर्चा शेतकरी शिरजगाव कसबा यांच्या मध्ये सुरू आहे.

मात्र या प्रकरणात तहसीलदार यांचा अहवाल हा निर्णायक ठरणार आहे.त्यामुळे अहवाल काय दिशा देणार हे महत्त्वाचे आहे.

*प्रतिक्रिया*

उपविभागीय अधिकारी यांच्या कडून आरोपाचे खंडन

“नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन हा विषय संबंधित तहसील कार्यलाय चा आहे.त्यामुळे तलाठी यांच्या आणि माझा या प्रकरणात काहीच संबंध नाही.”
👉🏻ड्रॉ.व्यक्तट राठोड उपविभागीय
अधिकारी अचलपूर
*————————————–*

2)”8 महिन्या अगोदर चौकशी अधिकारी म्हणून मीच होतो.आम्ही संबंधित शेतकरी यांचे बयान सुध्दा घेण्यात आले होते.मात्र ग्रामपंचायत निवडवून लागल्याने शेतकरी यांचे रेकॉर्ड पाहाणे झाले नाही.त्याची सर्व माहिती तहसीलदार यांच्या न्यायालयात आहे.””

👉🏻अर्जुन वांदे निवडणूक विभाग तहसील कार्यालय

*————————————————————-*

3)””””आठ महिन्या अगोदर प्रकरण ची चौकशी झाली होती तसा अहवाल आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या कडे सुद्धा पाठविला होता.
आताच्या प्रकरणात तलाठी काझी यांची तळेगाव या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

👉🏻शिल्पा बोबडे तहसीलदार चांदुर बाजार

*बॉक्स*
*मात्र जे अधिकारी आपल्या अधिकार यांचं गैरवापर करून मनमानी करीत असेल यांची बदली करून प्रकरण शांत केले जात आहे का ? हा एक प्रश्न आहे तर*आठ महिन्या अगोदर काहीच कार्यवाही न झाल्यामुळे तर तक्रार कर्ते यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या वर आरोप केले नाही.हे कोडे ठरले आहे.*