निवड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची

0
1480
Google search engine
Google search engine

बीड, नितीन एस ढाकणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची निवड आज होणार आहे. या पदासाठी अनेक नावे चर्चेत असून आज दुपारी त्यावर शिक्कमोर्तब होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याने त्यानिवडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे हल्लाबोल आंदोलनात त्यांनी संपूर्ण राज्यात फिरून पक्षाची ताकद आजमावली आहे.शिवाय सोशल मिडिया किंवा प्रत्यक्षातही राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधातल्या प्रत्येक मुदद्यावर बोट ठेवत आहे. ग्रामीण भागासह शहरातही त्यांचे लक्ष असून तिथेही कार्यकर्त्यांना आक्रमक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.