कृषी विभागामार्फत किसान कल्याण कार्यशाळेचे विविध विषयावर मार्गदर्शन

0
800
Google search engine
Google search engine

संग्रामपुर /.दयालसिंग चव्हाण :-

ग्राम स्वराज अभियानांतर्गत दि.२ मे रोजी खेतान सभागृहामध्ये तालुका स्तरावर किसान कल्याण कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. कृषी व कृषी सलग्न विभागाशी संबंधित शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठीचे धोरण, कृषी विभागाच्या विविध योजना या विषयी शेतकऱ्यांना विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण व यामध्ये देण्यात आलेल्या खत व्यवस्थापन करणेसाठी आवश्यक प्रशिक्षण, कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी, शेतमाल काढणीपश्चात घ्यावयाची काळजी, शेतमाल स्वच्छता व प्रतवारीसाठी आवश्यक प्रशिक्षण, पशुचिकित्सा शिबीर, कापसावरील बोंड अळीचे नियंत्रण, प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंकिंगसाठी जनजागृती मोहीम, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणेसाठी मार्गदर्शक घडीपत्रिकेचे वितरण, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना संदर्भात तालुका कृषी विभाग व पशुसवंर्धन विभागाच्या वतीने यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रगतीशील यशोगाथा, कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील पळशी झाशी येथील शेतकरी गुलाबराव मारोडे व वरवट बकाल येथील महादेवराव डाबरे या दोन प्रगतीशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये गटविकास अधिकारी सतिश देशमुख ,तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्व़र सवडतकर, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सोनोने तसेच कृषी विभागातील मंडळधिकारी जे.डी.नागे,ए.पी.लाड, बी.एम.असंबे, एम.डी.मोहिते, ए.पी.माचवे, आर.एम.इंगळे, यु.आर.गायकी, एस.बी.निकम, ए.व्हि.बोंबटकार, एस.आर.अवचार, एस.व्हि.इंगळे, एस.डी.गाडेकर, पि.आर.पडघान, एस.आर.यदमाळ, व्हि.टी.टिकाळे, एस.व्हि.इंगळे, एम.एल.पावरा, एस.चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.