RSS प्रमुखाणी दिली शेगांव शाखेला भेट

0
1221
Google search engine
Google search engine

शेगांव:- हिंदू समाजाची यादी ही विस्तारित यादी असून विस्तारत जाणारी आहे.. जगाची सगळी मानवता सर्व सृष्टी येई पर्यंत तो समाज थांबणारा समाज नाही शुद्ध आत्मिक सात्त्विकता हिंदू समाजात यावी तसेच आपले नाव मोठे होऊन जगात मोठी संघटना व्हावी अशी संकुचित वृत्ती संघाची नाही … संपूर्ण विश्वाला सुखी करणारा हिंदू समाज संघटित करावे इतकी शक्ती उभी राहिली पाहिजे असे वक्तव्य सर संघचालक मोहनजी भागवत यांनी मलकापूर येथे आयोजित एका खाजगी कार्यक्रमात केलंय… मलकापूर येथे भारतीय नागरिक उत्थान समिती या संघाच्या बाळासाहेब देवरस स्मृती भवन चे लोकार्पण कार्यक्रम करण्यास आले होते त्या वेळी ते बोलत होते…
या नंतर सायंकाळी ५:३० ला गजानन महाराजांचे दर्शन व६ वाजता शाळा क्रमांक ५ च्या संघ शाखेत प्रार्थना करुन त्यांचा पुढचा प्रवास सुरु होईल