निरोड येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान

0
587
Google search engine
Google search engine

संग्रामपुर / दयालसिंग चव्हाण –

तालुक्यातील निरोड (बाजार) येथील आज दिनांक 07 मे रोजी दुपारच्या 12 वाजताच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे घराला व गोठयाला आग लागून सुमारे 6 लाखांचे नुकसान झाले. या आगीमध्ये जनार्दन बळीराम परमाळे,बळीराम शिवराम परमाळे,संजय मार्तंडराव सौदागर यांच्या गोठयाला व घरामधील नुकसान झाल्यामुळे पुर्णपणे साहित्य़ भस्मसात झाले .
घटनेची माहिती मिळताच तहसिलदार एल.के.चव्हाण,मंडळधिकारी, तलाठी, घटनास्थळी दाखल होऊन आगीच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला.