वॉटरकप जलसंधारणासाठी पालिकेच्या शिक्षकवृंदाचे भरीव योगदान : बावन्न हजार रुपयाची लोकवर्गणी स्वरुपात मदत

0
993
Google search engine
Google search engine

आकोट – संतोष विणके :

पाणी फाऊंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेतील आकोट तालुक्यातील सातपूड्याचे पायथ्याशी वसलेल्या आदीवासी ग्राम डांगरखेड येथील जलसंधारणाच्या कामासाठी आकोट नगर परिषदेच्या शिक्षक वृंदांनी लोकवर्गणी स्वरुपात ५२ हजार रुपयांची भरिव आर्थिक मदत देवून सामाजिक बांधिलकीचा परिचय घडविला आहे.

लोकवर्गणीचा धनादेश पालिकेचे शिक्षण प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांचे हस्ते ग्रामपंचायतचे सचिव एस. आर ठोंबरे यांना प्रदान करण्यात आला
प्रा संदिप बोबडे, मुख्याध्यापक मंगेश दसोडे,शिक्षक संघाचे अध्यक्ष अंबादास लाघे उपस्थित होते.

नगरपरिषद शिक्षक नेहमी चांगल्या कामात पुढे असतात.डांगरखेड ग्रामस्थांना त्यांनी मोठा आधार दिला हे कार्य अभिनंदनास पात्र आहे असे
गौरवद् गार याप्रसंगी बोलतांना नंदकिशोर हिंगणकर यांनी काढले.

डांगरखेड येथील डोंगरमाथा हिरवागार करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एवढ्या तप्त उष्णतामानात जीवाचा रान करीत वॉटर कप स्पर्धेत मोठ्ठ काम उभं केले आहे आकोट पालिकेचे मुख्य अधिकारी गीता ठाकरे यांचे नेतृत्वात अधिकारी कर्मचारी आणि शिक्षकवृंदांनी आठवड्यातला एक दिवस येथील गांवक-यासोबत प्रत्यक्ष श्रमदानात तन मन धनाने भाग घेवून मोठा आधार दिला आहे.
पोकलॕन्ड मशीनचे डिजेल,अन्नदान व इतर कामासाठी नगरपरिषद मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी प्रत्येकी ५००रुपये लोकवर्गणी देवून मोठा हातभार लावला आहे.गतवर्षी देखील न प शिक्षकांनी ३०हजार रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून येथे मदत दिली होती हे विशेष.

डांगरखेडचा डोंगरमाथा हिरवागार फुलविण्यासाठी गांवक-यांना तन मन धनाने मदत करण्यासाठी मुख्य अधिकारी गीता ठाकरे व प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांचे आवाहनाला नगरपरिषद शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आम्ही शिक्षक बंधूभगिनी सदैव राष्ट्रीय व सामाजिक कार्यक्रमात भाग घेवून निष्ठेने कर्तव्य पार पाडतो.जल है तो कल है। हा संदेश दिला आहे अशी भावना नगरपरिषद शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक अंबादास लाघे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी नगरपरिषद शाळांचे मुख्याध्यापक सुनिल तरोडे,
मुक्तार शहा, सुनिल वडाळ, अ आरीफ, सुधाकर पिंजरकर, अफजल हुसेन,राजेंद्र लांडे, शाहिस्ता अंजुम, जहिरोद्दीन जनाब, सुषमा अहिर., मन्साराम खोटे,आसिफ शहा, सशिअ समन्वयक रितेश निलेवार,महेंद्र राऊत,सलिम अहमद शिक्षण लिपिक रघुनाथ बेराड आदी हजर होते.