विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक – 488 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

0
1117
Google search engine
Google search engine

अमरावती : विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूकीत 489 मतदारांपैकी 488 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची एकूण टक्केवारी 99.80 इतकी आहे.
तहसील कार्यालय स्तरावर एकूण 14 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान शांततेत पार पडले.
मतदार यादीत महापालिकेचे 92 सदस्य, जिल्हा परिषदेचे 59 सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती 14, नगर परिषद 249 सदस्य, नगरपंचायत 75 असे एकूण 489 सदस्यांचा समावेश आहे. त्यापैकी 249 पुरुष मतदारांनी तर 239 स्त्री मतदारांनी अशा एकूण 488 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केंद्रनिहाय आकडेवारी

धारणी 25 पैकी 25 (100 टक्के), चिखलदरा 25 पैकी 25 (100 टक्के), अंजनगाव सुर्जी 34 पैकी 34 (100 टक्के), अचलपूर 50 पैकी 50 (100 टक्के), दर्यापूर 28 पैकी 28 (100 टक्के), चांदूर बाजार 27 पैकी 27 (100 टक्के), भातकुली 22 पैकी 21 (95.45 टक्के*), मोर्शी 30 पैकी 30 (100 टक्के), अमरावती 98 पैकी 98 (100 टक्के), वरुड 54 पैकी 54 (100 टक्के), नांदगाव खंडेश्वर 24 पैकी 24 (100 टक्के), तिवसा 23 पैकी 23 (100 टक्के), चांदूर रेल्वे 24 पैकी 24 (100 टक्के), धामणगाव रेल्वे 25 पैकी 25 (100 टक्के).
मतमोजणी दिनांक 24 मे, 2018 रोजी सकाळी 8 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होईल.