★सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे निर्भिड व्यक्तीमत्व म्हणजे सुनिल मोहीते उर्फ कँप्टन★

0
951
Google search engine
Google search engine

सांगली / कडेगांव /हेमंत व्यास :-

कडेगांव चे शिवसैनिक व समाजिक कार्यात आघाडीवर असणारे कोणतेही पद न घेता समाजासाठी प्रामाणीक व निर्भिडपणे अहोरात्र झटणारे कार्यकर्ते म्हणुन नाव घ्यायचे झाल्यास कडेगाव तालुक्यातुन एकमेव नाव सुनिल मोहीते ऊर्फ कँप्टन यांचे घ्यावे लागेल.कडेगांव मध्ये ऐतिहासिक दारूबंदी चलवल उभा करण्यात सिंहाचा वाटा आहे.कडेगावातील महीलांची संसाराचा गाडा ओढताना होणारी जी दमछाक होताना दिसत होती त्यावर कोणीतरी आवाज उठवला पाहीजे दारू पासुन या महीलांचे संसार वाचले पाहीजेत या एकमेव हेतुने दारूबंदी चलवल उभारली व गावातील महीलांनीही या चलवलीत सहभाग नोंदवला हा लढा गावाच्या दृष्टीने वाखाणण्या जोगाच होता असे म्हणावे लागेल.

कडेगावातील कानाकोपऱ्यात जोमाने दारूबंदी मुक्तीचे समाजप्रबोधन करण्यात व कोणत्याही सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सुनिल मोहीते हे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व.बालासाहेब ठाकरे यांचेवर प्रेम करणारा निस्सिम भक्त म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणा गावातील समाज कार्यात धावुन येणारा हा कडवट सैनिक आहे शासनाच्या असे निदर्शनास आले की अवैध दारू निर्मिती व विक्रीवर पायबंद घालण्यासाठी काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही यास्तव अवैध दारूधंद्याच्या अनुषंगाने काढलेल्या आदेशाचे पालन होते का नाही हे पाहण्यासाठी तसेच अवैध धंद्याना परिणामकारकपणे आला घालण्याच्या दृष्टीने गठीत करण्याचा शासनाने निर्णय घेतला व त्याची अवैध दारू बंदी तालुकास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड केली आहे याबाबत कडेगांवचे तहसिलदार राजेंद्र यादव यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.यावेली ज्ञानेश्वर शिदे साहेब,असिफ तांबोली,मुसा इनादार,बंडा मोरे,आमोल चन्ने ,निखिल धर्मे उपस्थित होते.कडेगांव दारूबंदी चलवलीतील सौ संजिवनी डांगे,सुलोचना मोरे नगरसेवीका अश्वीनी वेल्हाल यांनी अभिनंदन केले तसेच अवैध दारूबंदी समीतीत निवड झाली म्हणुन कडेगांव ग्रामस्थ व तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे