चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रदीप वाघ यांची बिनविरोध निवड

0
936
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)

चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. या निवडणूकीत बाजार समितीच्या सभापतीपदी प्रदीप वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

चांदूर  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.प्रभाकर वाघ यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणूकीसाठी शनिवारी विशेष सभा बोलविण्यात आली. यावेळी झालेल्या निवडणूकीत बाजार समितीच्या सभापतीपदी प्रदीप वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक बी.एस.पारीसे यांनी काम पाहिले. तत्कालीन सभापतीच्या निवडीच्या वेळेस सभापतीचा कार्यकाळ अडीच वर्षाचा ठरविण्यात आला होता. त्यानुसार बाजार समितीचे सभापती प्रा.प्रभाकर वाघ यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला.चांदूर रेल्वे बाजार समितीवर आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांच्या गटाचे निर्विवाद सत्ता असून अठराही संचालक आमदार जगताप गटाचे आहेत. प्रदीप वाघ यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सर्व संचालकांनी पुष्पहार घालून त्यांचे जोरदार स्वागत केले.यानंतर झालेल्या सत्कार समारंभात बाजार समितीचे संचालक राजकुमार जालान, बंडुभाऊ जगताप, प्रविण घुईखेडकर, प्रा.प्रभाकर वाघ, श्रीरामपंत इंगोले यांनी आपले विचार व्यक्त करून नवनिर्वाचीत सभापतीचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे संचालन उपसभापती अशोक चौधरी यांनी केले. या निवडणूकीच्या वेळी उपसभापती अशोक चौधरी, प्रा. प्रभाकर वाघ, अतुल चांडक, प्रदीप जगताप, रवींद्र देशमुख, मंगेश धावडे, सुनिताताई विनोद काळमेघ, सविताताई अनिल देशमुख, प्रविण घुईखेडकर, रमेश महात्मे, रविकांत देशमुख, वैशालीताई दिनेश ठाकरे, हरिभाऊ गवई, भानुदास गावंडे, राजकुमार जालान, बंडुभाऊ मुंधडा, प्रदीप गुजर, नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी यांच्यासह विशेष निमंत्रीत जिमसबँचे संचालक बंडुभाऊ देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश आरेकर, श्रीरामपंत इंगोले, अनिल देशमुख, संगीतराव हजारे, बाळासाहेब ठाकरे, सुरेश वाघ, बालु देशमुख, सचिव चेतन इंगळे, अभिजित देशमुख यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा  हितासाठी काम करणार-सभापती प्रदीप वाघ

चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अठराही संचालक काँग्रेसचे आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांच्या गटाचे आहे. आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व संचालकांना सोबत घेऊन बाजार समिती शेतकऱ्यांचा  हितासाठी काम करीत राहिल असे मत नवनिर्वाचीत सभापती प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.

प्रदीप वाघ बाविस वर्षापासून बाजार समितीचे संचालक
नवनिर्वाचीत सभापती प्रदीप वाघ १९९६ पासुन चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत असून त्यांना बाविस वर्षाचा प्रदिर्घ अनुभव आहे.१९९६-९७ व २००० ते २००२ मध्ये दोनदा त्यांनी चांदूर रेल्वे नगर परिषदेचे नगराध्यक्षपदही भूषविले आहे.