त्या दोन आरोपींची अमरावती कारागृहात रवानगी >< दोघांनाही मिळाला एमसीआर - चांदूर रेल्वे येथील पोलीस कर्मचारी हत्या प्रकरण

0
682
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान  ) 
       चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड तांडा येथे पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील दोन मुख्य आरोपींची पोलीस कोठडीत संपल्यानंतर त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
         चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड येथील बंजारा तांड्यावर अवैध गावठी दारूचे उत्पादन होत असल्यामुळे या दारू अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी गेले होते. यावेळी अवैध दारू विक्रेत्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला असता यामध्ये सतिष मडावी नामक पोलीस कर्मचारी यांचा जागीच मृत्यु झाला असुन जाधव नामक कर्मचारी जखमी झाले होते. या हत्याप्रकरणातील अटक मुख्य आरोपी उमेश शालिकराम राठोड (३०) व अजय उर्फ राजा सकरू राठोड (२०) यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना गुरूवारी (ता. ७) न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर दोन्ही मुख्य आरोपींची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी चार आरोपी फरार असून पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.