चांदूर रेल्वे स्थानकातील बसेस धावल्या एक-दीड तास उशीरा >< इंटरनेट सर्वर डाऊन, तिकीट मशीन अपडेटसाठी विलंब

0
787
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) १८ टक्के भाडेवाढ लागू झाली. अशातच काही तिकीट मशीन रविवारी दुपारी अपटेड करीत असतांना इंटरनेट सर्वर डाऊन झाले होते. यामुळे अनेक बसेस एक ते दीड तास उशिरा स्थानकातून रवाना झाल्या. यामुळे प्रवाशांचा एवढा वेळ बसमध्येच बसून राहावे लागल्यामुळे मनस्ताप झाला.
    एसटीची भाडेवाढ झाल्यामुळे स्थानकातील सर्व तिकीट मशीन अपडेट करणे अनिवार्य असते. अशातच काही तिकिट रविवारी दुपारी २ वाजता अपडेट करीत असतांना सर्वर डाऊन झाले होते. यामुळे मशीन अपडेट करायला विलंब झाला. घुईखेड गाडीची निघण्याची वेळ दुपारी २.१५ वाजताची असतांना ती बस ३.३० वाजताच्या दरम्यान रवाना झाली. यासह इतरही गावी जाणाऱ्या ३-४ बसेस अशाच एक ते दीड तास उशिरा धावल्या. एवढ्या वेळापर्यंत प्रवाशांना बसमध्येच बसून राहावे लागल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. रविवारचा बाजाराचा दिवस असल्याने बसमध्ये तालुक्यातील लोकांची गर्दी असते. त्यामुळे या लोकांना सुध्दा याचा फटका बसला. तर अनेकांनी खाजगी वाहनाचा आश्रय घेतला.