बोगस डॉक्टर वरठाणेदार अजय आकरे यांची कार्यवाही

0
1287
Google search engine
Google search engine

गोपनीय माहिती च्या आधारे केली कार्यवाही डॉक्टर याला अटक.

चांदुर बाजार /आसेगाव प्रतिनिधी

चांदुर बाजार तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत बोगस डॉक्टर कोणत्याही कायदेशीर दस्तऐवज नसताना आपला डॉक्टर व्यवसाय करीत होता यांची गुप्त माहीत आसेगाव चे ठाणेदार अजय आकरे याना मिळताच त्यांनी त्याला आज दिनांक 19 जून 2018 ला सायंकाळी 4वाजून 55 मिनिटांनी अटक केली आहे.त्यांच्या या कार्यवाही मुळे बोगस डॉक्टर याना एक प्रकारची धसकच बसली आहे.
आरोपी नानीगोपाल नितीयारंजन रॉय असे आरोपी चे नाव असून त्याच्यावर वैद्यकीय अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.या कार्यवाही मध्ये चांदुर बाजार येथील वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.तसेच ही कार्यवाही ठाणेदार आसेगाव पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन खुफिया स्वप्नील तवर ,नंदू किशोर बकाल,मोहन टोनपे यांनी केली