प्रहार कामगार संघटनेच्या  ठीय्या आंदोलनास यश – मार्च महिन्याचे थकीत वेतन तात्काळ प्रधान करण्यात आले.

0
971
Google search engine
Google search engine

अमरावती / –

जिल्हा सामान्य रूग्णालय अमरावती येथील अधिनस्त रूग्णालयातील कार्यरत सुरक्षा रक्षकांचे गेल्या अनेक महिन्यापासूनचे थकीत वेतन अमरावती सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती यांना प्रदान करण्यात आले नसल्यामुळे आज सकाळी ११.०० वाजता प्रहार कामगार संघटनेचे चिटणीस श्री प्रदिप वडतकर ,सहचिटणीस श्रीकांत चौधरी यांनी सुरक्षा रक्षकांना सोबत घेऊन जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक शामसुंदर निकम यांच्या कक्षात ठीय्या आंदोलन करून निवेदन सादर करून थकीत वेतनाबाबत बैठक घेण्यात चर्चा करण्यात आली.बैठकीत सह चिटणीस श्रीकांत चौधरी यांनी एप्रिल,मे महिन्याचे थकीत वेतन सुध्दा त्वरीत प्रदान करण्यात यावे असा इशारा सुध्दा प्रहार कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला.तसेच जिल्हा चिकित्सक यांना प्रदिप वडतकर यांनी इशारा देऊन यानंतर सुरक्षा रक्षकांचे वेतन प्रदान करण्यासाठी प्रहार कामगार संघटनेला पून्हा आंदोलनाची वेळ येणार नाही याबाबत दक्षता घेण्यासाठी सुचेना दिली त्या अनुषंगाने शामसुंदर निकम यांनी तात्काळ माहे मार्च महिन्याचे थकीत वेतन रु १०.०० लक्ष अनुदान अमरावती सुरक्षा रक्षक मंडळाच्या बिम्स प्रणालीवर जमा केले प्रहारचे ठींय्या आंदोलन असल्यामुळे प्रशासनाने धावपळ झाली आंदोलनापुर्विच जिल्हा चिकित्सक यांच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.अखेर प्रहारच्या कार्यकत्यांनी ठीय्या देऊन आंदोलन करून सुरक्षा रक्षकांना प्रहार कामगार संघटनेने न्याय मिळवून दिला ठीय्या आंदोलनाकरीता प्रदिप वडतकर सह,श्रीकांत चौधरी, अध्यक्ष संजय कदम, गौरव ठाकरे ,अनिजभाई, अनिल ढगे,सुरेंद्र डोंगरदिवे ,नितीन कपीले, अजय वाकोडे ,राजेंद्र महल्ले ,गजानन मोहोड ,मंगेश पवार प्रशांत काळे,सुरेंद्र बोरकर, अमोल शंकरपाडे, चंदू पांडे, रवि भरणे, असीन सरदार आदींची उपस्थिती होती.