कडेगांवच्या स्नेहल तांबडेची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड

0
1763
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव – हेमंत व्यास/-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत स्नेहल नंदकुमार तांबडे हीने यश मिळवले. तिची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झाली असून ती सह्याद्रि ज्ञानप्रबोधिनीची विद्यार्थिनी आहे. कडेगांव येथील सुनिल मधूकर देशमुखे यांची ती बहिण आहे.
स्नेहल तांबडे हिने भारती विद्यापीठात शालेय शिक्षण घेऊन तेथेच महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले. प्रशासकीय सेवेत करिअर घडवण्याची महत्त्वकांक्षा असल्याने तिने कडेगांवच्या सह्याद्रि ज्ञानप्रबोधिनीत प्रवेश घेतला. प्रदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सन 2016 ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. या परिक्षेचा निकाल बुधवारी जाहिर झाला. या परिक्षेत स्नेहल तांबडे हिने यश मिळवले. याच बॅचच्या विटा येथील सुप्रिया गायकवाड, स्नेहल सोमदे, तोंडोली येथील अश्विनी मोहिते, नेवरीच्या मनिषा महाडिक, मोहसीन मुल्ला यांनीही यश मिळवले. हालाखीच्या परिस्थितीवर मात करत स्नेहलने हे यश मिळवले. आई नंदा तांबडे यांनी कष्ट करून स्नेहलला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना व्यक्त झाली. स्नेहलच्या यशाने कडेगावच्या लौकीकात भर पडली आहे. या यशाबद्दल बोलताना स्नेहल म्हणाली खडतर परिस्थितीवर मात करून आईने शिक्षणासाठी पाठबळ दिले. प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे ध्येय होते. हे ध्येय गाठण्यासाठी प्रदीप कोळी यांचे मार्गदर्शन मिळाले. कडेगांवच्या लौकीकास साजेशी कामगिरी करून प्रशासकीय सेवा करणार आहे. पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेली कडेगांवची पहिलीच सुकन्या असल्याने कडेगांवातील सर्व नागरीकातुन सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.