प्लॅस्टिक बंदीचा निर्णयाचा सामान्यांना त्रास होतोय, तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावर बोलायला हवं – श्री राज ठाकरे

0
782
Google search engine
Google search engine

२३ जूनला प्लॅस्टिक बंदी आली आणि कारवाई सुरु झाली, लोकांमध्ये संभ्रम आणि भय आहे. मला समजत नाही प्लॅस्टिकबद्दल कसली घाई होती? बंदीपूर्वी पुरेशी जनजागृती का केली गेली नाही?

महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी झाल्यापासून मुख्यमंत्र्यांचं एकही विधान का नाही? हा निर्णय एका खात्याचा आहे का पूर्ण सरकारचा आहे? प्लॅस्टिकने संपूर्ण आयुष्य घेरलं गेलं आहे. मग बंदी करायची तर सगळ्याच प्लॅस्टिकवर का बंदी का नाही? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत