जनसंग्राम कडून शाळेला प्रोजेक्टर भेट >< ग्लोबल ज्ञान आत्मसात करणे स्पर्धा युगात आवश्यक- श्री विवेक ठाकरे

0
801
Google search engine
Google search engine

निंभोरा,ता.रावेर-

आजच्या स्पर्धा युगात शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अभ्यास पद्धतीत तुलना केली जात असली तरी डिजिटल व्यवस्थेमुळे सर्वांना आपले कौशल्य सिद्ध करता येऊ शकते त्यासाठी शिक्षकांनी स्वतः व विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ग्लोबल ज्ञान आत्मसात करावे,असे आवाहन जनसंग्राम बहुजन लोकमचंचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी केले.

जनसंग्राम बहुजन लोकमंचच्या वतीने स्व.कलाबाई देविदास ठाकरे यांच्या स्मरणार्थ येथील सौ.डी.आर.चौधरी माध्यमिक विद्यालयाला ७० हजार किमतीचे HITCHI 5000 मल्टिमीडिया प्रोजेक्टर कायमस्वरूपी भेट म्हणून देण्यात आले.यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमप्रसंगी विवेक ठाकरे यांनी शाळा डिजिटल होण्यामुळे विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याचे विवेचन आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणुकादेवी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ईश्वरशेठ चौधरी हे होते.
निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे व निंभोरा गणाचे पं.स.सदस्य दीपक पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापिका श्रीमती सायराबी खान व उपशिक्षक नरेंद्र दोडके यांच्याकडे प्रोजेक्टर स्वाधीन करण्यात आले.यावेळी माजी दीपक पाटील यांच्यासह सरपंच अमान खान,डॉ.महेंद्र भालेराव व एपीआय प्रकाश वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले.उपस्थित सर्वांनीच जनसंग्राम संघटनेच्या सामाजिक भावनेतून चालविलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली.

सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास ढाके,ग्रा.पं.सदस्य रमेश येवले, मुजाहिद गुलाब शेख,मधुकर बि-हाडे,महालक्ष्मी ज्वेलर्सचे मनोज दामुसेठ दुसाने, नरेंद्र नामदेव ढाके,सुधाकर भंगाळे,रविंद्र नेहते न्यु इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक ए.एच.वारके सर व मुख्याध्यापिका श्रीमती सायराबी खान हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाय.डी.पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलशाद शेख सर व प्रा.दिलीप सोनवणे यांनी केले.आभार नितीन दोडके सर यांनी मानले.

यश्वस्वीतेसाठी नदीम शेख,दस्तगीर खाटीक,गौरव ठाकरे,किरण सपकाळे, संदीप मोरे,आकाश बोरसे,धिरज चौधरी, ललित पाटील,अतुल येवले,नवाज पिंजारी,ईश्वर पाटील,किरण कोंडे व विद्यालयाच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.