विनय गोटफोडे यांचा अ.भा. ग्रा. पत्रकार संघटनेने केला सत्कार – गोटफोडे नुकतेच घुईखेडच्या सरपंचपदी झाले विराजमान

0
1340
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .) 
    चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील सरपंचपदी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष विनय गोटफोडे यांची नुकतीच सरपंचपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार संघटनेच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
    अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे सचिव संजय मोटवानी हे नगरसेवकपदी निवडुन आल्यानंतर त्यांची गटनेते पदावर वर्णी लागली होती. त्यानंतर आता तालुका उपाध्यक्ष विनय गोटफोडे हे घुईखेड ग्रामपंचायतच्या सरपंचपदावर विराजमान झाल्यामुळे पत्रकार संघटनेच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे विनय गोटफोडे यांचा अ.भा.ग्रा. पत्रकार संघटनेच्या वतीने नुकताच शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, पत्रकार संघटनेचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य युसुफ खान, जिल्हाध्यक्ष प्रा. रविंद्र मेंढे, तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगिवकर, अमोल गवळी, विवेक राऊत, संजय मोटवानी, मनिष खुने, अभिजीत तिवारी, मंगेश बोबडे, इरफान पठान, राजेश सराफी, अमर घटारे, धिरज नेवारे, शहेजाद खान आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.