ब्राम्हणगाव (विंचूर) येथे महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शिवार फेरी व कार्यशाळांचे आयोजन

0
763
Google search engine
Google search engine

नाशिक(उत्तम गिते)

ब्राम्हणगाव (विंचूर) येथे महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शिवार फेरी व एकदिवसीय कार्यशाळांचे आयोजन तालुका कृषी विभाग व इतर विभागाकडून करण्यात आले.

या प्रसंगी कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौ. भारती मंगेश गवळी यांनी भूषविले. यावेळी कृषी विभागाचे नोडल अधिकारी श्री पाटील साहेब यांनी जलयुक्त शिवार योजनेची व कृषी विभागाच्या योजनेची माहिती दिली तसेच जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग निफाड चे उपअभियंता श्री गोटे साहेब यांनी जलयुक्त शिवार योजनेत होणाऱ्या कामाबाबत सविस्तर माहिती देऊन आराखडा करण्यासाठी ग्रामस्थांनी व शेतकरी वर्गाने सहकार्य करावे असे आवाहन केले.

तसेच गावाच्या वतीने सरपंच सौ भारती मंगेश गवळी यांनी कृषी व पाटबंधारे विभागाच्या नादुरुस्त बंधारे त्यामधील गाळ काढून जास्तीत जास्त खोलीकरण करावे आणि शिव नदीवरील साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे,गाळ काढणे व गावातील जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे आराखडय़ात बसवण्याबाबत सूचित केले.

कार्यशाळेनंतर ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्य अधिकारी,कर्मचारी व शेतकरी यांनी शिवार फिरून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.या वेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला व उपस्थितांमध्ये कृषी विभागाचे मंडळ अधिकारी,श्री मरदेवर साहेब,कृषी सहाय्यक सौ आहिरे मॅडम,ग्रामसेवक श्री डी टी साळुंके,वि का  सोसायटी चेअरमन श्री रावसाहेब गायकवाड,मंगेश गवळी,संपतराव जाधव,अण्णा कुंदे,गणपत गवळी सोमनाथ जाधव,निवृत्ती पोटे,बाळासाहेब गवळी, आप्पासाहेब दरगोडे,सुनील गवळी,विष्णू लुटे,इमान मन्सुरी तसेच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश गवळी यांनी केले आभार कृषी सहायक सौ आहिरे यांनी मानले.