आमदार श्री बच्चू कडू यांच्या दिर्घआयुष्यसाठी अंबादेवीला साकडे – वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात फळवाटप

0
977
Google search engine
Google search engine

अमरावती /

शेतकऱ्यांसाठी जिवाचे रान करणारे,दिव्यांगाच्या समस्यांना वाचा फोडणारे,गोरगरीबांचे कैवारी वेळीच समस्या सोडवून न्याय मिळवून देणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त प्रहारचे खंदे सर्मथक गिरजाशंकर यादव यांनी आज गुरुवारी सकाळी ९.०० वा. अंबादेवी मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते .अंबादेवीला महाआरतीने आमदार बच्चू कडू यांच्या दिर्घआयुष्यसाठी याचना करण्यात आली. महाआरतीने बच्चू कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

महाआरतीकरीता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर ,शहरप्रमुख चंदु खेडकर तसेच प्रहारचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी अंबादेवी मंदिरात महाआरती करण्यात आली.तसेच बच्चु कडू यांना दिर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.यानंतर विद्यार्थी संघटना शहरप्रमुख शुभम राऊत, विनोद सातंगे यांच्याही वाढदिवस प्रसंगी अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात वार्ड क्र. ५ मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शामसुंदर निकम,प्रदिप वडतकर ,चंदु खेडकर,राहूल पाटील, मुकेश गुडीयाल यांच्या प्रमुख उपस्थित रूग्णांना,लहान मुलांना फळांचे वाटप करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्त पूरवठा उपलब्ध करून देण्यासाठी रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिराकरिता मुकेश गुंडीयाल मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.आ.बच्चु कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रहार
जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर, शहरप्रमुख चंदु खेडकर यांच्या सह जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे पदाधिकारी राहूल पाटील,बबलु माहुलकर,अमोल कवालकर ,गिरीजाशंकर यादव ,महीला शहरप्रमुख सौ .रंजना लगड सौ योगीता मोहीते, प्रविण शिंदे,प्रशांत काळे,राजेंद्र महल्ले ,हेमंत निखार,मुकेश सोनी, संतोष लगड,शुभम राऊत,भरत काटकर,डॉ येवले,शरद ठवळी,संदिप रोघे, विजय कटके,मनोज शर्मा,अरविंद डबरे,दिनेश कपीले,पप्पू मानकर ,दिपक गुप्ता,रोशन कडू,अंकुश भूरे,राजेंद्र कोठे,मुक्ता गंगात्रे, रोशन देशमुख ,प्रदिप चांगोले,उमेश पांडे,नंदू थोरात,असंख्य कार्यकत्यांची उपस्थिती होती.