चांदूर रेल्वेचे पीएसआय लसंते यांची विनाकारण १७ वर्षीय युवकाला मारहाण – वडिलांचा आरोप @CMOMaharashtra @Dev_Fadnavis

275
युवक झाला भयग्रस्त, अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
एसपी, एसडीपीओ यांच्याकडे लेखी तक्रार
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    एकीकडे शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असतांना पोलीस तपासात अयशस्वी ठरत आहे. तर दुसरीकडे विनाकारण निष्पाप युवकाला पकडून त्याला मारहाण करीत असल्याचा आरोप एका नागरीकाने केला असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामिण पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन केली आहे.
     लेखी तक्रारीनुसार, चांदूर रेल्वे शहरातील महादेवघाट परिसरातील राजेश कालकाप्रसाद विश्वकर्मा (४५) हे शहरातील शांतताप्रिय नागरीक असून रविवारी त्यांच्या घरी नाव ठेवण्याचा कार्यक्रम होता. त्यांच्या घरी नातलग पाहुणे सुध्दा होते. त्यांचा १७ वर्षीय मुलगा अजय राजेश विश्वकर्मा व इतर पाहुणे कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री घरासमोर ओट्यावर बसले होते. रात्री १२ ते १ च्या दरम्यान चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पीएसआय लसंते व त्यांचे सहकारी यांनी अजय विश्वकर्मा ला कोणतेही कारण नसतांना बळजबरीने पोलीस गाडीत बसविले. यावेळी अजय सोबत असलेला विक्की विश्वकर्मा याने पोलीसांना याबाबत विचारले असता त्यालाही घानेरड्या शिव्या देऊन त्याच्यावर दबाव टाकला असून अजयला गाडीत बसविल्यावर पीएसआय लसंते यांनी पैसे देऊन मॅटर सलटवतो अन्यथा मुलाला आतमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप राजेश विश्वकर्मा यांनी केला आहे. सदर महाभयंकर अन्याय पीएसआय लसंते व इतर कर्मचारी यांनी केल्यामुळे अजय विश्वकर्मा दहशतीत असल्याचे सांगितले. अजय विश्वकर्मा घरच्या दुकानात सायकल, मोटार सायकल, ट्रॅक्टर पंचर दुरूस्तीचे काम करतो. तसेच राजेश विश्वकर्मा व अजय विश्वकर्मा यांच्यावर आजपर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही. तरीही अजयला चांदूर रेल्वे पोलीसांना रात्री पकडून मारहाण करून २-३ तासात सोडून दिले. मात्र तरीही अजयने पोलीस आपल्याला पुन्हा पकडून नेतील का ? अशी धास्ती धरली असून त्याने जेवन बंद केले आहे. त्यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरीत होईल व प्रकृतीवर वाईट परिणाम झाल्यास त्याला पीएसआय जबाबदार राहिल असेही वडिलांनी सांगितले आहे.
     तरी निष्पाप व्यक्तीला पकडने, मारहाण करने, पैसे मागणे, अवाच्छ भाषेत बोलने असा अन्याय करणाऱ्या पोलीसांवर शहानिशा करून कारवाई करावी जेणेकरून आमच्या कुटुंबास बिनाधास्तीने जीवन जगता येईल अशी मागणी राजेश विश्वकर्मा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीतून केली आहे. तसेच सदर तक्रार ग्रामिण पोलीस अधिक्षक व पोलीस महानिरीक्षक, मुंबई यांच्याकडे पोस्टव्दारे पाठविल्याचे सांगितले आहे.
सदर युवकाला मारहाण केली नाही – पीएसआय लसंते
रविवारी रात्री शहरात चोरी झाली असतांना सि. सि. टी. व्ही. फुटेज तपासल्यानंतर आरोपीचे केस रंगविलेले असल्याचे आढळून आले. तर अजय विश्वकर्मा हा रात्री १ च्या दरम्यान फिरत होता व त्याचे केस सुध्दा रंगविलेले होते. त्यामुळे संशयीत म्हणून त्याला ताब्यात घेतले होते. व त्यानंतर पुन्हा फुटेज तपासल्यानंतर सदर युवकाला चोरी झालेल्या ठिकाणावरून त्याच्या भावाच्या ताब्यात देऊन दिले. त्याला कुठलीही मारहाण केलेली नसल्याचे पीएसआय लसंते यांनी सांगितले. 
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।