अकोट शहरात जननी 2 मोहिमे अंतर्गत कॉर्नर मीटींगसह विद्यार्थिनी व महिलांचे प्रबोधन

0
1650
Google search engine
Google search engine

आकोट /संतोष विणके -अकोट शहरात जननी2 मोहिमे अंतर्गत पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली विविध ठीकाणी प्रबोधनपर कार्यक्रम सुरू असून त्या अंतर्गत खानापूर वेस येथील तथागत महिला मंडळ तर्फे कॉर्नर मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये पोलिस निरीक्षक गजानन शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक गवई, ह्यांनी उपस्थित महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन केले, तसेच साहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर यांनी वसुंधरा ज्ञानपीठ, जिल्हा परिषद शाळा,स्वामी विवेकानंद शाळा, लाल बहाद्दूर विद्यालय येथे मुलींना मार्गदर्शन केले। जननी2 अंतर्गत संपूर्ण शहरात जोरदार जनजागृती सुरू असुन या मोहीमेस महीलांचा जोरदार प्रतिसाद मिळतो आहे…