चांदुर बाजार बँक प्रकरणात विधी अधिकारी पोलीस जाळ्यात

0
1231
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार येथील एसबीआय फसवणूक प्रकरणात विधी अधिकारी याला मध्य रात्री पोलिसांनी केली अटक,
चार वर्षांपासून चे प्रकरण अखेर निघणार निकाली

चांदुर बाजार :- प्रतिनिधी

चांदुर बाजार तालुक्यातील गुळ साथ च्या बाजूला असलेल्या भारतीय स्टेस्ट बँक शाखा या ठिकाणी खोटे दस्तऐवज दाखल करून तब्बल 90,30,800 रुपये च्या जवळपास बँकेची फसवणुक केल्याची तक्रार चांदुर बाजार पोलीस स्टेशन मध्ये बँक व्यवस्थापक सत्येंद्र कुमार सिह यांनी दिली.या मध्ये सुरुवातीला एकाच शेतकरी यांच्या विरोधात तक्रार होती मात्र पोलिसांच्या चौकशी मध्ये यांची संख्या 96 वर पोहचली असून या मध्ये यांनी 138 कर्ज घेतल्याचे समोर आले.तर या सर्व प्रकरणात चांदुर बाजार पोलिसांनी फिल्ड अधिकारी जीवन लक्ष्मण वरठे याला महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण भटले हा एजंट ,दत्तात्रय चांदूरकर याना पोलीस अटक करून कारागृहात पाठविण्यात आले आहे. तर आलेले दस्तऐवज खरे असल्याने सांगून त्यांचे कर्ज मिळून देणाऱ्या विधी अधिकारी ऍड.रवींद्र खोजरे रा.काडली परतवाडा याला दिनांक 20 च्या मध्यरात्री नंतर चांदुर बाजार पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरून अटक केली.मात्र अटकेनंतर प्रकृती बिघडली असल्याने त्यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले असल्याचे ही माहिती आहे.त्यांच्यावर भादवी 420 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.तर ते 2 -3बँक मध्ये विधी अधिकारी म्हणून काम पाहत असल्याचे माहिती समोर येते आहे.त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे घडला असल्याची शंका व्यक्त होते आहे.तर या प्रकरणी 109 जणांचे दोषारोप दाखल होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.ही कार्यवाही आयपीएस अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.