लासलगाव येथील जिजामाता कन्या विद्यालयात जागतिक हेड ॲण्ड नेक कॅन्सर दिन व गुरूपौर्णिमा उत्साहाने साजरी

0
1170
Google search engine
Google search engine
नाशिक :- उत्तम गिते-
लासलगाव जिजामाता कन्या विद्यालयात जागतिक हेड ॲण्ड नेक कॕन्सर दिनानिमित्त विद्यार्थिनींनी तंबाखूचा धोका आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत ‘चला घडवूया व्यसनमुक्त समाज’ या मोहिमेअंतर्गत “कर्म जागृती “तंबाखू मुक्ती  जनजागृती अभियानाचे आयोजन केले.यासाठी लघुपट दाखवून विद्यार्थिनींना व अध्यापकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली . तसेच गुरूपौर्णिमानिमित्त पारंपारिक वेशभूषा करुन सर्वधर्मसमभाव शिकवण देऊन गीतमंचच्या विद्यार्थिनींनी गुरुवंदना सादर केली .शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाषणे ,गीत व भेटवस्तू दिली .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील ,सचिव संजय पाटील ,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर ,कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लता जाधव ,पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी शिंदे ,विश्वास पाटील ,बाळासाहेब झाल्टे ,सचिन अहिरे,रेखा सपकाळे,पौर्णिमा लिमकर,रेश्मा वैष्णव ,आरती गायकर ,शारदा केदार ,अर्चना पानगव्हाने यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .