लोकनेते विद्यालयात सुरक्षिततेवर पांढरे साहेबांचे मार्गदर्शन संपन्न

0
908
Google search engine
Google search engine
नाशिक :- उत्तम गिते-
लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त उच्च माध्यमिक व एन.सी.सी. विभागातर्फे लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. शिवचरण पांढरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे धडे देण्यात आले.त्यांनी मार्गदर्शनात रॅगिंग,सायबर क्राईम,सोशल मिडीयाचा वाढता गैरवापर,महिला सुरक्षा व कायदा या विषयी माहिती दिली.विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणा बरोबर सामाजिक जाणीव ठेवून आदर्श नागरिक तयार होण्यासाठी शालेय शिस्त,व्यक्तिमत्त्व विकास,विविध कलागुण अवगत करावे हे नमूद केले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील ,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,सचिव संजय पाटील,शंतनू पाटील,कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील,प्राचार्या अनिता अहिरे,सुधाकर सोनवणे,पोलिस कॉन्स्टेबल आजगे साहेब तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एन.सी.सी.विभाग प्रमुख प्रमोद पवार तर आभार कैलास अहिरे यांनी मानले .