सर्व पेट्रोल पंपावर बायोमेट्रीक पेमेंट सुविधा सुरू होणार.

0
572
Google search engine
Google search engine

लवकरच देशातील सर्व पेट्रोलपंपावर बायोमेट्रीक पेमेंट सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर रोख रक्कम, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे द्यायची गरज भासणार नाही. ग्राहकांनी केवळ आपल्या अंगठ्याचा ठसा उमटवताच खरेदी केलेल्या पेट्रोलचे पैसे जमा होतील. पुढील दोन महिन्यात ही सेवा सुरू होणार आहे. मायक्रो एटीएम ऑक्सीजन मशिनच्या सहाय्याने ही पेमेंट सुविधा सुरू केली जाणार आहे.इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याबाबत ऑक्सीजन मायक्रो एजन्सी आणि आयडीएफसी बँकेशी करार केला आहे. मध्य प्रदेशमधील दोन पेट्रोल पंपावरही मशिन लावण्यातही आली आहे. भोपाळ शहराला कॅशलेस इंडियामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन इंडियाने बुधवारी सर्वच पेट्रोलपंप मालकांसहित इतरही एजन्सींच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये आयओसीएलचे महाव्यवस्थापक आजम मतीन यांचाही समावेश होता. मतीन यांनीच या पेमेंट सुविधाबाबत माहिती दिली. भोपाळ मधील पेट्रोल पंपांवर पुढील दोन महिन्यांत ही सेवा सुरु करण्यात येणार असूनत्यासाठी सर्वचपेट्रोल पंपांकडूनतयारी करुन घेतल्याचे मती यांनी सांगितले.

काय आहे मायक्रो एटीएम ऑक्सीजन मशिन….

मायक्रो एटीएम ऑक्सीजन मशिन एक प्रकारची पॉईंट ऑफ सेल मशिन आहे. ज्याद्वारे रिटेल नेटवर्कच्या सहाय्याने पैसे ट्रान्सफर करता येतात. ही मशिन डेबिट, क्रेडिट, क्यूआर कोड, भीम, आधार पे आणि युनीफाईड पेमेंट इंटरफेस(युपीआय) ची सेवा एकसोबत उपलब्ध करुन देते. त्यासाठी मशिनमध्ये केवीयी प्रकिया पूर्ण करावी लागणार आहे.