पुण्यातील ‘एल्गार परिषदे’चा नक्षलवाद्यांशी संबंध दर्शवणारी २५० कागदपत्रे पोलिसांना प्राप्त !

0
1013
Google search engine
Google search engine

 

पुणे  ‘एल्गार परिषदे’चा नक्षलवाद्यांशी संबंध दर्शवणारी २५० कागदपत्रे पोलिसांना प्राप्त झाली असून त्यामुळे नक्षलवाद्यांचे षड्यंत्र उघड झाले आहे. या पत्रव्यवहारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट उल्लेख असून ‘केंद्र सरकार ज्या पद्धतीने पुढे जात आहे, त्यामुळे आपले अस्तित्व धोक्यात येईल’, असे या पत्रांत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी २ ऑगस्टला दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर आयोजित वार्तालाप कार्यक्रमात कदम बोलत होते.

कोरेगाव–भीमा येथील लढाईस २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी पुण्यातील शनिवारवाड्यात ‘एल्गार परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनामागे नक्षलवाद्यांचे पाठबळ होते आणि त्यांनीच कॉ. सुधीर ढवळे यांना सुरेंद्र गडलिंग अन् शोमा सेन यांच्या माध्यमातून पैसा पुरवला. ‘एल्गार परिषदे’शी नक्षलवाद्यांचा संबंध या अनुषंगाने तीन पत्र सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रदर्शित झाली;मात्र पोलिसांकडून ती पत्र उघड (‘लिक’)  झालेली नाहीत, असे कदम पुढे म्हणाले.