लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील सिध्दार्थ शिंदे या विद्यार्ध्यांने राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.

0
921
Google search engine
Google search engine

नाशिक :- उत्तम गिते

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला.त्यात लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी यश संपादित केले.राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती विभागात राज्यात चार विद्यार्थी तसेच जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती विभागात अकरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीत राज्यात सिध्दार्थ शिंदे ( प्रथम ),अनुराग शिंदे यांचा (दुसरा),अथर्व जाधव (तिसरा),अनिकेत शिंदे (सहावा),तसेच जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेस समिक्षा खैरे,प्रसाद गांगुर्डे,प्रणव गवळी,श्रद्धा पाटील,तन्वी दगडे,सिद्धांत पांगूळ,श्रीरंग भावसार,मंजिल भामरे,शुभम कासार,तनिषा कायस्थ,गितांजली शिंदे पात्र ठरले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,सचिव संजय पाटील,कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील,शंतनू पाटील,प्राचार्या अनिता अहिरे,पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी,सुधाकर सोनवणे,सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीहरी शिंदे,सोनाली वाणी,स्मीता क्षिरसागर,विद्या कुळधरन , प्रतिभा डोंगरे,हेमंत अहिरे,जयवंत दळवी,सुर्यकांत गावित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.