कडेगांव येथे मोहरमच्या पुर्व तयारीला वेग

0
1144
Google search engine
Google search engine
 
सांगली  / हेमंत व्यास –
सांगली जिल्ह्यातील कडेगांव हे हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या कडेगांवच्या ऐतिहासिक मोहरम सणाची पुर्व तयारी सुरू झाली आहे.कडेगावचा मोहरम सण हिंदुस्थानात गगनचुंबी,आकाशाला उंच भिडणाऱ्या ताबुतासाठी व हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे,आणि तेवढ्याच उंच मनाची माणसे शेकडो वर्षांपासून ही परंपरा जपत आहेत.आजही ही परंपरा तशीच सुरू आहे.मोहरम निमित्त एकुण १४ ताबुत बसविले जातात.पैकी सुतार,शेटे, देशपांडे याचेही ताबुत असतात.या मोहरमचा मान हा देशपांडे,सुतार,शेटे,शिंदे देशमुख माळी,रास्कर इत्यादी हिंदु बांधवांकडे असतो.ताबुत बांधण्यास एक महिना लागतो, जवळपास १ ते २३ मजले ताबुतमध्ये असतात.ताबुतची उंची ११०ते १३५ फुटापर्यंत असते.या ताबुतांचे बांधकाम कळकाच्या (बांबुच्या),चिकण मातीच्या साहाय्याने सुतातुन केले जाते ताबुत बांधताना कुठेही गाठ दिली जात नाही हे या ताबुतांचे खास वैशिष्ट्य मानले जाते.वास्तुशास्त्राच्या आधारावर बांधकाम केले जाते.त्यानंतर त्यावर रंगीत आकर्षक कागद लावले जातात.विद्युत रोषणाई केली जाते.मनोऱ्यासारखे उंच दिसणारे ताबुत आणि ताबुताच्या भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र,कर्नाटक राज्यातुन हजारो लाखो लोक येतात.  इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातु हजरत इमाम हुसेन यांनी बलिदान देवुन इस्लाम धर्म जिवंत ठेवला त्याची आठवण म्हणुन हा मोहरम सण साजरा केला जातो.सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील मोहरम सणाला मात्र वेगळी परंपरा लाभली असल्याचे दिसून येते.हा सण सप्टेंबर महीन्यात येत आहे परंतु ताबुताचे अधिकृत बांधकाम बकरी ईद पासुन सुरू होणार आहे.त्याची पुर्व तयारी आतापासूनच सुरू केली आहे.ताबुतासाठी कळक बांबु लागतात.ताबुताचे बांधकाम सुतापासुन केले जाते.सुत मिळविण्यासाठी लोक विटा व इचलकरंजी येथे जात आहेत.ताबुतांना रंगीबेरंगी कागद व आकर्षक विद्युत रोषणाईसाठी आत्तापासूनच लोक पुणे मुंबईला जावु लागले आहेत.!